घरमुंबईमालाडच्या आप्पा पाडा झोपडपट्टीला लागली भीषण आग

मालाडच्या आप्पा पाडा झोपडपट्टीला लागली भीषण आग

Subscribe

मुंबईच्या उपनगरातील मालाड येथील आप्पा पाडा झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दाटीवाटीच्या ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीची आग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसात मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी होत नसली तरी या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत आहे. आज (ता. १३ मार्च) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुंबईतील मालाड पूर्व येथे असलेल्या आप्पा पाडायेथील आनंद नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीत १५ – २० गॅस सिलिंडरचा स्फोट झाला माहिती मिळत आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला असून त्याची ओळख मात्र पटलेली नाही. या घटनेची माहिती मिळत अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनासाठली दाखल झाल्या आहेत.

मिळाल्या माहितीनुसार, मालाड पूर्व परिसरात असलेल्या आप्पा पाडायेथील आनंद नगर झोपडपट्टीत १० हजार चौरस मिटर परिसरात ८०० – १००० झोपड्या आहेत. या आगीत मोठ्या प्रमाणात झोपड्या जळून खाक झाल्या.  येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. याच भागात असलेल्या आनंद नगर झोपडपट्टीला अचानक भीषण आग लागली. या आगिचाई माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. लागलेली ही आग लेव्हल २ ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ही आगा वीजविण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. ही झोपड्पट्टी डोंगरवार पसरलेली असल्याने अग्निशनम दलाला आग वीजविण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – विधानसभेत आदित्य ठाकरे आणि आशिष शेलारांमध्ये जोरदार खडाजंगी, ‘या’ मुद्यावरुन भिडले

दरम्यान, ही आग लागल्यानंतर तात्काळ या परिसरात असलेल्या इतर घरातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम स्थानिक नागरिक आणि अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. तसेच सदर परिसर हा अत्यंत दाटीवाटीचा असल्याने या भागात आग अधिक पसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

- Advertisement -

आज मुंबईत आग लागण्याची ही दिवसभरातील दुसरी घटना असून, सकाळी ११ च्या सुमारास ओशिवरा परिसरात असलेल्या फर्निचर दुकानांना सुद्धा भीषण आग लागली होती. सुदैवाने त्या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी त्या आगीत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून सदर झोपड्यांना लागलेल्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र आगीचे नेमके कारण माहिती नाही. घटनास्थळी मदतकार्य जोमात सुरू असल्याचे माजी उप महापौर सुहास वाडकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -