घरताज्या घडामोडीमुंबई कोरोनामुक्तीचे लक्ष्य ठेवा!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई कोरोनामुक्तीचे लक्ष्य ठेवा!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Subscribe

कोरोना विरुद्धचा लढा आता अंतिम टप्प्यात आल्याचे समजून तो जिंकण्यासाठी पावले उचलावीत आणि मुंबई कोरोनामुक्त करण्याचे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले. कोरोना रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेडस् सरकारने ताब्यात घेतले आहेत. काही ठिकाणी क्षेत्रीय रुग्णालये उभारून सुविधा निर्माण केल्या आहेत. यासर्व सुविधांमध्ये रुग्णसेवेवर आता अधिक लक्ष देतानाच रुग्णवाहिका सेवेचे नियंत्रण करावे, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

मुंबईतील महापालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी नेमण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी देशात मोकळ्या मैदानावर रुग्णालये उभारण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर असून अशा सुविधा निर्माण झाल्याने रुग्णांची बेडससाठी होणारी गैरसोय टळल्याचे सांगितले.

- Advertisement -

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारी जीवनावश्यक औषधांचा साठा महापालिकडे उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. आता सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. मात्र, त्याचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने झाला पाहिजे. सरकारने जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत आणि त्यामध्ये चांगली सेवा मिळते याबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा. जेणेकरून मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा ओढा कमी होईल आणि रुग्णालयांवरचा ताण देखील कमी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेडस ताब्यात घेतले आहेत, अशा रुग्णालयांनी सध्या किती रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि किती बेडस रिक्त आहेत याची यादी बेडसच्या क्रमांकासह दररोज रुग्णालयाच्या दरवाजावर लावावी, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली.

ठाणे जिल्ह्यातील स्थितीबाबत चिंता

उद्धव ठाकरे यांनी आज ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ठाण्यात कोरोनाची वाढ गुणाकार पद्धतीने होत आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाची साथ झपाट्याने पसरत असून हा केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठी सुद्धा चिंतेचा विषय बनल्याचे ठाकरे यांनी जिल्ह्यातील महापालिका आयुक्तांच्या बैठकीत सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करताना स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत विशेषत: झोपडपट्टयांमध्ये वॉर्डनिहाय युनिट स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -