घरमुंबईपीएमसी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती

पीएमसी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती

Subscribe

आरबीआयची हायकोर्टात माहिती

आर्थिक घोटाळाग्रस्त पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) प्रशासक नेमल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मंगळवारी मुंबई हायकोर्टात दिली. आरबीआयच्या निवृत्त अधिकार्‍याची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या देखरेखीखाली यापुढे बँकेचा कारभार चालेल, असे आरबीआयने हायकोर्टात सांगितले.

पीएमसी बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. खातेधारक आणि गुंतवणूकधारकांना दिलासा देण्यासाठी काय उपाययोजना केल्या, असा सवाल हायकोर्टाने आरबीआयला विचारला. तेव्हा बँकेत प्रशासक नेमला असून त्याच्या देखरेखीखाली बँकेचे व्यवहार सुरू राहतील, असे आरबीआयने हायकोर्टाला सांगितले. त्यानंतर याप्रकरणाची पुढील सुनावणी 4 डिसेंबर रोजी असेल, असे हायकोर्टाने स्पष्ट केले.

- Advertisement -

खातेदारांची हायकोर्टाबाहेर घोषणाबाजी

पीएमसी बँकेसंदर्भात मंगळवारी हायकोर्टात सुनावणी होणार असल्याने खातेदारांनी हायकोर्ट परिसरात गर्दी केली होती. पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर तैनात होता. यावेळी खातेधारकांनी‘आरबीआय चोर है,हमारा पैसा वापस कर दो आरबीआय ’, अशा घोषणा देण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -