Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात बढती

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात बढती

Subscribe

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात बढती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात बढती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात बढती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात बढती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती दत्ता यांच्याबाबत केलेली नियुक्तीची शिफारस केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर आणि त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे. (Appointment Of Chief Justice Dipankar Dutta To The Supreme Court)

केंद्रीय न्याय व विधि मंत्री किरण रिजिजू यांनी रविवारी याबाबतचे ट्विट केले. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता हे मुळचे कोलकाता उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश होते. त्यानंतर दीपांकर दत्ता यांची २८ एप्रिल २०२० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच नियुक्ती केल्यानंतर दीपांकर दत्ता यांनी मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेण्याकरिता आणि पदभार हाती घेण्याकरिता कोलकाता ते मुंबई असा रस्ते प्रवास केला होता.

- Advertisement -

२०२०मध्ये देशभराता कोरोनाने थैमान घातले होते. वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यावेळी सर्व वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आल्या होता. अशा स्थितीत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी कोलकाता ते मुंबई असा रस्ते प्रवास केला होता.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती दत्ता यांनी महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत. विशेषत: जनहित याचिकांवर त्यांनी महत्वपूर्ण निर्णय दिले. यामध्ये कोरोनाविषयक प्रकरणे, मेट्रो-३ कारशेडचा वाद, पवई येथील सायकल मार्गिकेचे प्रकरण, माध्यमप्रणित निवाड्यांचा मुद्दा, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेली याचिका, प्रसारमध्यमांवर वचक ठेवण्याबाबत माहिती- तंत्रज्ञान कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीला दिलेले आव्हान, सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांना सामावून घेण्याचे धोरण आखण्याचे प्रकरण अशा अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा समावेश आहे.

- Advertisement -

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचे वडिलही कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होते. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६५ रोजी झाला. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी १९८९ मध्ये कायद्याची पदवी घेतली. त्याच वर्षी त्यांनी वकील म्हणून नावनोंदणी केली. तसेच सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयांमध्ये घटनात्मक आणि दिवाणी प्रकरणे लढवली.


हेही वाचा – गुजरातमध्ये काँग्रेस का हरली, जबाबदार कोण? पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईलींनी दिले स्पष्टीकरण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -