घरमुंबईगोरेगाव - मुलुंड लिंक रोडच्या अभ्यासासाठी 'आयआयटी' ची नियुक्ती

गोरेगाव – मुलुंड लिंक रोडच्या अभ्यासासाठी ‘आयआयटी’ ची नियुक्ती

Subscribe

गोरेगाव - मुलुंड लिंक रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडींची समस्या कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.

पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेने गोरेगाव – मुलुंड लिंक रोडचे काम हाती घेतले आहे. गोरेगाव – मुलुंड लिंक रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडींची समस्या कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. मात्र या मार्गावरुन रोज किती गाड्यांची ये-जा असते तसेच गाड्यांचा वेग किती व वाहतूक कोंडी किती प्रमाणात असते याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई आयआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामाच्या अंतर्गत ओबेरॉय मॉल चौक , पश्चिम द्रुतगती मार्ग , गोरेगाव ( पूर्व) येथे ट्रॅफिक सिम्युलेशन ( वाहतूक चलप्रतिरूप) अभ्यासासाठी टेंडर न मागविता आयआयटी, मुंबई या संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी या संस्थेला पालिका १५ लाख रुपये देणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

मुंबई महापालिकेतर्फे गोरेगाव – मुलुंड लिंक रोड ( जीएमएलआर) प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्वी उपनगरातील मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. या गोरेगाव – मुलुंड लिंक रोडची लांबी १२.२ किमी इतकी आहे. त्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली प्रस्तावित भूमीगत बोगद्याची लांबी ४.७ किमी इतकी असणारा आहे. त्याचप्रमाणे गोरेगाव फिल्मसिटमधील प्रस्तावित कट आणि कव्हर भुयारी मार्गाची लांबी १.०२ किमी इतकी असणार आहे.

- Advertisement -

दर रस्त्यावरील पूर्व व पश्चिम उपनगरातील प्रमुख चौकांमध्ये सहापदरी उड्डाणपुलाचे काम नियोजित आहे. या लिंक रोडचे काम पूर्ण झाल्यावर मुंबईच्या उपनगरातील सध्याचे रस्त्यांचे जाळे वाहतूक कोंडीपासून मुक्त होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या प्रकल्पाअंतर्गत या लिंक रोडवर गोरेगाव येथे पश्चिम द्रुतगती मार्गखाली वाहतुकीसाठी १९मीटर रुंद चार पदरी भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. या लिंक रोडची प्रस्तावित रुंदी ही २७.४५ मीटर असून सद्यस्थितीत साधारणपणे २४ मीटर रुंद आहे.


हेही वाचा – राणी बागेला २ झेब्रा जोडीवर सिंह, लांडगा, अस्वलांच्याही जोड्या मिळणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -