घरमुंबईमुंबईकरांसाठी १०० चायनीज व्हेंटिलेटरची खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

मुंबईकरांसाठी १०० चायनीज व्हेंटिलेटरची खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

Subscribe

मुंबईत महापालिकेच्या विविध रुग्णालये व जंबो कोरोना सेंटर या ठिकाणी आवश्यक १०० व्हेंटिलेटरच्या खरेदीचा प्रस्ताव शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

मुंबईतील कोरोनाची स्थिती पाहता मुंबई महापालिकेने विविध रुग्णालयांसाठी आवश्यक १०० व्हेंटिलेटरची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे व्हेंटिलेटर ‘मेड इन चायना’ कंपनीचे असणार आहेत. त्यासाठी पालिका पुरवठादार कंपनीला तब्बल १६.१७ कोटी रुपये मोजणार आहे. यासंदर्भातील प्रस्तवाला शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यामुळे कोरोनाची आलेली दुसरी लाट आणि भविष्यात येऊ शकणारी तिसरी लाट याचा गांभीर्याने विचार केला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व महापालिका, सरकारी रुग्णालये यांसह राज्याच्या आरोग्य यंत्रणेला सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत महापालिकेच्या विविध रुग्णालये व जंबो कोरोना सेंटर या ठिकाणी आवश्यक १०० व्हेंटिलेटरच्या खरेदीचा प्रस्ताव शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. तसेच, यावेळी, ३ हजार बेड खरेदी करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

मेड इन चायना व्हेंटिलेटर
कोरोना विषाणूचे संकट हे भारताचा शत्रू असलेल्या चीन देशामधूनच संपूर्ण जगावर ओढवले आहे. चीन हा भारताचा नंबर एकचा शत्रू असून चीनने भारतीय हद्दीत नेहमी घुसखोरी केली आहे. भारताचा काही भूभागही चीनने गिळंकृत केला आहे.
मात्र मुंबई महापालिका, मे.सन इलेक्ट्रो मेडिकल डिव्हाईसेस या पुरवठामार्फत व्हेंटिलेटर उत्पादन करणाऱ्या चीनच्या मे.शेंनझेन मिड्रे बायो मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स कंपनीकडून १०० व्हेंटिलेटरची खरेदी करणार आहे. सध्या भारतावर व विशेषतः मुंबईवर कोरोनाचे संकट अजून कायम आहे. तर दुसरीकडे वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, लस यांची कमतरता भासते आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने अत्यंत गरजेचे वस्तू म्हणून चायनीज कंपनीकडून १०० व्हेंटिलेटरची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका एका व्हेंटिलेटरसाठी (परिरक्षण खर्चासह) कंत्राटदाराला १६ लाख १७ हजार ७७३ रुपये प्रमाणे १६ कोटी १७ लाख ७७ हजार ३२५ रुपये मोजणार आहे.

- Advertisement -

हे वाचा-  Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना परिस्थिती सुधारतेय! २४ तासांत ३,९२५ रुग्णांची नोंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -