घरताज्या घडामोडी'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' साठी १ हजार ४ झाडे हटविण्यास मंजुरी

‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ साठी १ हजार ४ झाडे हटविण्यास मंजुरी

Subscribe

एमएमआरडीए मार्फत 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' प्रकल्प साकारण्यात येत आहे.

मुंबई, नवी मुंबई, रायगड यांना जोडणाऱ्या प्रस्तावित ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ प्रकल्पासाठी १ हजार ४ झाडे हटविण्यासंदर्भातील प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीने आज मंजुरी दिली आहे. ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ हा प्रकल्प २२ किमी लांबीचा आहे. ठाणे खाडीवर त्यासाठी पूल बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे शिवडी, नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी, रायगड , पुणेपर्यंतचा प्रवास कमीत कमी वेळेत होणार आहे. त्यामुळे या महत्वाकांक्षी पुलाच्या बांधकामात बाधा आणणारे तब्बल १हजार ४ झाडे हटविण्यात येणार आहेत.

यामध्ये, पुलाच्या जागेत बाधा आणणाऱ्या १ हजार १७२ झाडांचा समावेश आहे. त्यापैकी १हजार ४ झाडे हटविणे गरजेचे ठरले आहे. यामध्ये, ४५४ झाडे कापण्यात येणार आहेत. ५५० झाडे ही हटवून पुन्हा लावण्यात येणार आहेत. तर १६८ झाडे ही आहे त्याच ठिकाणी तशीच ठेवण्यात येणार आहेत. जी ४५४ झाडे कापण्यात येणार आहेत, त्यामध्ये बहुतांशी झाडे सुभाबुळ आहेत. तर पिंपळ, वड, गुलमोहर, पिसोनिआ,चिंच, कडुलिंब, सोनमोहर, अशोक व चेरी आदी झाडांचा समावेश आहे.

- Advertisement -

एमएमआरडीए मार्फत ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ प्रकल्प साकारण्यात येत आहे. त्यामुळे एमएमआरडीए तर्फ़े पालिकेकडे सदर झाडे हटविण्याबाबतचा प्रस्ताव १८ जून २०१८ रोजी मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. तर त्याबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता ही ५ ऑक्टोबर २०२० रोजी करण्यात आली. मात्र ‘एमएमआरडीए’ने त्यामुळे यासंबंधीत प्रस्तावाला मंजुरी मिळण्यात काहीशी अडचण आली व उशीरही झाला. त्याचा काहीसा परिणाम एकूण प्रकल्पाच्या कामावरही झाला आहे. मात्र या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सदर १ हजार ४ झाडे हटविणे अत्यंत गरजेचे ठरते.

वसईमधील ३ गावांत पर्यायी २ हजार झाडे लावणार

- Advertisement -

‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ साठी जी १ हजार ४ झाडे हटविण्यात येणार आहेत, त्याला पर्याय म्हणून वसईमधील राजीवली गाव (सर्व्हे १४३), कामन गाव ( सर्व्हे २१०), बापने गाव (सर्व्हे ११४)या तीन गावात २ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. जेव्हा या प्रकल्पातील झाडे हटविण्यात येतील त्याच्या १५ दिवसात ‘फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि.( महाराष्ट्र शासकीय उपक्रम) यांच्या माध्यमातून पर्यायी २ हजार झाडे लावण्यात येणार आहेत.


हेही वाचा – विनामास्क फिरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये पाठवा – उच्च न्यायालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -