घरताज्या घडामोडीगिरगाव, माटुंगा येथे जलवाहिनी फुटली; पाणीपुरवठा खंडित

गिरगाव, माटुंगा येथे जलवाहिनी फुटली; पाणीपुरवठा खंडित

Subscribe

मुंबईत गिरगाव चौपाटी व माटुंगा मोठ्या जलवाहिन्या फुटल्याच्या घटना घडल्या. माटुंगा येथील जलवाहिनी फुटल्याने सायन, वडाळा, अँटॉप हिल आदी परिसरातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला.

मुंबई : मुंबईत गिरगाव चौपाटी व माटुंगा मोठ्या जलवाहिन्या फुटल्याच्या घटना घडल्या. माटुंगा येथील जलवाहिनी फुटल्याने सायन, वडाळा, अँटॉप हिल आदी परिसरातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे रहिवाशांचे हाल झाले. तर गिरगाव चौपाटी परिसरातील फुटलेल्या जलवाहिनीची पाणीपुरवठा खंडित न करता युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात आल्याने या परिसरातील नागरिकांना पाणी समस्येचा फटका न बसता दिलासा मिळाला. (Aqueduct burst at Girgaon Matunga Water supply interrupted)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या एफ/ दक्षिण विभागातील जे. के.भसीन मार्ग पंजाबी कॉलनी येथे शुक्रवारी पाणीपुरवठा करणारी १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी अचानक फुटली. याबाबतची तक्रार होताच पालिकेच्या सहाय्यक अभियंता जलकामे (परिरक्षण) शहर या विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले.

- Advertisement -

त्यासाठी संपूर्ण एफ/उत्तर विभागात पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे वडाळा, अँटॉप हिल, कोरबा मिठागर, सायन कोळीवाडा, पंजाबी कॉलनी, रावळी कॅम्प आदी ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे रहिवाशी हवालदिल झाले. मात्र फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आल्याने लवकरच या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

दरम्यान, गिरगाव चौपाटी येथे ६०० मिमी व्यासाच्या भूमिगत जलवाहिनीला आज मोठी गळती लागली. याबाबतची तक्रार प्राप्त होताच पाणीपुरवठा खात्याच्या अभियंत्यांनी व कामगारांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र पालिकेने कोणताही पाणी पुरवठा खंडित न करता हे जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात यश मिळवले. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

- Advertisement -

हेही वाचा – शशी थरूर यांच्या जाहिरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा! माफी मागून त्वरित केला बदल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -