घरमुंबईडोंबिवलीत भाजपा पदाधिकारीऱ्याकडे सापडला शस्त्रसाठा

डोंबिवलीत भाजपा पदाधिकारीऱ्याकडे सापडला शस्त्रसाठा

Subscribe

डोंबिवलीत भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला असल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे.

भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. धनंजय कुलकर्णी असे या भाजपा पदाधिकाऱ्यांचे नाव असून याप्रकरणी कल्याण गुन्हे शाखेनं ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चाकू, सुरे, तलवारी आणि बंदुका ताब्यात घेतल्या आहेत. कुलकर्णी यांनी त्यांच्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा का ठेवण्यात आला होता, याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

भाजपा पदाधिकारीऱ्याच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त

धनंजय कुलकर्णी हे भाजपाचे डोंबिवली शहराचे उपाध्यक्ष असून यांचे डोंबिवलीतील महावीर नगरमध्ये दुकान आहे. त्या दुकानात कल्याण गुन्हे शाखेने छापा टाकला असून पोलिसांना दुकानात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला. हा संपूर्ण शस्त्रसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला असून यामध्ये अनेक विदेशी पिस्तुलांसह चाकू, तलवारी आणि कुऱ्हाडी यांचा समावेश आहे. भाजपा शहर उपाध्यक्षाच्या दुकानात शस्त्रसाठा सापडल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबद्दल अद्याप भाजपाच्या एकाही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पोलिसांच्या कारवाईत अडथळे निर्णाण केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पोलिसांनी कारवाई थांबवावी, यासाठी वरुन दबाव आणला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

वाचा – नालासोपारा अवैध शस्त्रसाठा प्रकरण : ATSचं आरोपपत्र दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -