घरताज्या घडामोडीअर्णब गोस्वामींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला, आता सत्र न्यायालयावर भिस्त!

अर्णब गोस्वामींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला, आता सत्र न्यायालयावर भिस्त!

Subscribe

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक न्यूज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. अर्णब गोस्वाम यांनी उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सोमवारी उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता त्यांना अलिबाग सत्र न्यायालयामध्ये होणाऱ्या निर्णयावरच अवलंबून राहावं लागणार आहे. शनिवारी उच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्देश देताना अर्णब गोस्वामी यांना सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. त्यासोबतच, अर्णब यांच्या अर्जावर ४ दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले होते. या पार्श्वभूमीवर आज उच्च न्यायालयाने जामीन अर्जच फेटाळून लावल्यामुळे अर्णब यांना आता अलिबाग सत्र न्यायालया अर्ज करावा लागणार आहे.

शनिवारी अर्णब यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी तात्काळ जामीन देऊ शकत नाही असं नमूद करत न्यायालयाने सर्व बाजू ऐकून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. मात्र, त्याचवेळी अर्णब जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात अर्ज करू शकतात, असं देखील सांगितलं होतं. त्यानुसार, शनिवारी राखून ठेवलेला निर्णय आज उच्च न्यायलयाने दिला असून जामीन अर्ज फेटाळल्याचं स्पष्ट केलं आहे. अर्णब यांच्याबरोरच या प्रकरणातील इतर दोघे आरोपी फिरोज शेख आणि नितीश सारडा यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

- Advertisement -

दरम्यान, अर्णब यांची पोलीस कोठडी मिळावी, यासाठी अलिबाग पोलिसांनी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्या अर्जावर सत्र न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली आहे. सध्या अर्णब गोस्वामी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, त्यांना जामिनासाठी अद्याप कोणत्याही कारागृहाने दिलासा दिलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -