घरताज्या घडामोडीपोलिसांनी सासू-सासरे, मुलगा आणि पत्नीला केली धक्काबुक्की, अर्णब गोस्वामींचा आरोप

पोलिसांनी सासू-सासरे, मुलगा आणि पत्नीला केली धक्काबुक्की, अर्णब गोस्वामींचा आरोप

Subscribe

रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज सकाळी पनवेल पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्या थेट घरात घुसून त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अर्णब यांच्या घरात दीड तास हुज्जत घातली. यादरम्यान पोलिसांनी सासू-सासरे, मुलगा आणि पत्नीला धक्काबुक्की केल्याचा आरोपी अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. याबाबत एएनआयवृत्त संस्थेने ट्विट करून माहिती दिली आहे.

- Advertisement -

आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांचा मोबाईल फोन देखील पोलिसांना जप्त केला आहे. आयपीसी कलम ३०६ अंतर्गत अर्णब गोस्वीमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आहे प्रकरण?

मुंबईतील मराठी आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग येथे आत्महत्या केली. अन्वय नाईक यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’चे डिझाईन केले होते. मात्र, त्यांना पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी अलिबाग येथे आत्महत्या केली होती. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. अन्वय नाईक हे पेशाने आर्किटेक्ट होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीने अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन सरकारमधील बड्या नेत्यांच्या दबावामुळे योग्य प्रकारे होऊ शकला नाही, असा आरोप अन्वय नाईक यांच्या पत्नीने केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -