घरमुंबईफसव्या योजनेद्वारे 72 लाख लुटणार्‍या सराफाला अटक

फसव्या योजनेद्वारे 72 लाख लुटणार्‍या सराफाला अटक

Subscribe

ठाणे, कळवा, विटावा आणि मुंब्रा या भागातील तब्बल शंभर ते दीडशे नागरिकांची 72 लाखांची फसवणूक करणार्‍या सराफाला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरमहा पाचशे रुपयांपासून पुढे गुंतवणूक करा आणि पंधरा महिन्यांनंतर जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने मिळवा, अशा योजनेच्या माध्यमातून त्याने ठाण्यातील नागरिकांना विशेष करून महिला वर्गाला गंडा घातला आहे. फसवणूक झालेल्यांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

संतोष शेलार असे ताब्यात घेतलेल्या सराफाचे नाव असून तो घोडबंदर येथील पातलीपाडा भागात राहतो. त्याने नौपाड्यातील विष्णूनगर भागात त्रिमूर्तीरत्न ज्वेलर्स नावाने दुकान थाटले होते. या दुकानाच्या माध्यमातून त्याने दरमहा पाचशे रुपयांपासून पुढे गुंतवणूक करा आणि पंधरा महिन्यांनंतर जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने मिळवा अशा स्वरूपाची योजना केली होती. या योजनेकरता त्याने दलाल नियुक्त केले होते. या दलालांमार्फत अनेक जण योजनेमध्ये पैसे गुंतवत होते 2016 मध्येही योजना सुरू झाली.

- Advertisement -

पहिल्या मुदतीनंतर गुंतवणुकदारांना ठरल्याप्रमाणे पैसे मिळाले. त्यामुळे या योजनेची विश्वासार्हता वाढल्याने गुंतवणुकदारांचा आकडा वाढला. परंतु दुसर्‍या मुदतीनंतर गुंतवणुकदारांना पैसे मिळाले नाहीत. तसेच शेलार याने दुकान बंद केले आणि मोबाइलही बंद केला. याबाबत दलालांकडूनही काहीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून शेलार याला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -