Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमDacoity : दरोड्याच्या तयारीत असलेल्या त्रिकुटाला अटक; तिघे पसार तर आरोपीकडून घातक...

Dacoity : दरोड्याच्या तयारीत असलेल्या त्रिकुटाला अटक; तिघे पसार तर आरोपीकडून घातक शस्त्रे जप्त

Subscribe

दरोड्याच्या तयारीत असलेलया एका त्रिकुटाला दिंडोशी पोलिसांनी घातक शस्त्रांसह अटक केली. अब्दुल रफिक अब्दुल हमीद अन्सारी ऊर्फ अप्पू खोटे, अक्षय परशुराम कोतेकर आणि शोएब इमाम खान अशी या तिघांची नावे असून तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

मुंबई : दरोड्याच्या तयारीत असलेलया एका त्रिकुटाला दिंडोशी पोलिसांनी घातक शस्त्रांसह अटक केली. अब्दुल रफिक अब्दुल हमीद अन्सारी ऊर्फ अप्पू खोटे, अक्षय परशुराम कोतेकर आणि शोएब इमाम खान अशी या तिघांची नावे असून तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. (arrest of trio preparing for robbery; three escaped, dangerous weapons were seized from the accused)

या दरोडेखोरांचे तीन सहकारी पळून गेल्याने त्यांचा पोलिसाकडून शोध सुरू आहे. गोरेगाव येथील मोहन गोखले रोड, साईबाबा कॉम्प्लेक्स, ओम सुपर मार्केट परिसरात काहीजण दरोड्यासाठी येणार असल्याची माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी रात्री उशीरा तिथे आलेल्या सहापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली तर त्यांचे इतर तीन सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. चौकशीदरम्यान या तिघांचे नावे अब्दुल रफिक अन्सारी, अक्षय कोतेकर आणि शोएब खान असल्याचे उघडकीस आले.

- Advertisement -

हेही वाचा – Share Trading Fraud : शेअर ट्रेडिंगच्या नावाने 11 कोटींची फसवणूक; सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्‍या आरोपीस अटक

ते तिघेही गोरेगावच्या संतोषनगर, बीएमसी कॉलनीतील रहिवाशी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक सुरा, टेस्टर, चाकू, नायलॉनची रस्सी, मिरचीची पूड, लोखंडी कटावणी, पक्कड आदी घातक शस्त्रे पोलिसांनी जप्त केले. चौकशीत या तिघांनी तिथे दरोड्याच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली. मात्र त्यापूर्वीच या तिघांना पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अब्दुल रफिक अन्सारीविरुद्ध बारा, अक्षय कोतेकरविरुद्ध वीस तर शोएब खानविरुद्ध सतरा विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहेत. या तिघांविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर या तिघांनाही बुधवारी दुपारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (arrest of trio preparing for robbery; three escaped, dangerous weapons were seized from the accused)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -