घरमुंबईराहुल गांधींना तात्काळ अटक करा; रणजित सावरकरांची मागणी

राहुल गांधींना तात्काळ अटक करा; रणजित सावरकरांची मागणी

Subscribe

ही जर का भारत तोडो यात्रा असेल तर ती बंद करण्याची मागणी करण्याचे काम प्रत्येक राष्ट्रभक्ताचे आहे.

काँग्रेस खासदार राहुल (rahul gandhi) गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळेच सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरुद्ध शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी रणजित सावरकर यांच्यासोबत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेसुद्धा (rahul shewale) उपस्थित होते. पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर रणजित सावरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

यावेळी रणजित सावरकर (ranjit savarkar) म्हणाले, ‘सर्व गोष्टींचा त्याग करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी कष्ट भोगले, 14 वर्षांचा कारावास भोगला अशा सावरकरांचा घोर अपमान झाला आहे. असे रणजित सावरकर म्हणाले. मिमिक्री करत सावरकरांचा अपमान करण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे आणि त्या विरोधात मी राहुल गांधींविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे असे सावरकरांचे नातू रणजित सावरकर म्हणाले. या प्रकरणी पोलीस योग्य तो तपास करून कारवाई करतील असेही रणजित सावरकर म्हणाले.

- Advertisement -

rahul gandhi
त्याच संदर्भात पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि राहुल गांधींना अटक करावी अशी विनंती रणजित सावकरक यांच्या कडून पोलिसांना करण्यात आली. दरम्यान राहुल गांधी यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये सावरकरांनी इंग्रजांना जे पत्र लिहिले त्या पात्रातील काही भाग राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये वाचून दाखवला त्यावरही रणजित सावरकर यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे, राहुल गांधींनी जे वाचून दाखविले ती त्यावेळी पत्र लिहिण्याची पद्धत होती. पण त्याच काळात महात्मा गांधी यांनी देखील अशाच आशयाची पत्रं लिहिली होती. ज्या माणसांना शिष्टाचार काळात नाही त्यांना मूर्ख म्हणायचे की आणखी काय म्हणायचे हे मला कळत नाही पण जनतेने अशा लोकांपासून सुरू रहा, यांना भारत जोडायचा नाही तर तोडायचा आहे अशी टीका सुद्धा रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे  यांनी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून बंद करण्याची मागणी केली होती, त्यावर रणजित सावरकर म्हणाले ही जर का भारत तोडो यात्रा असेल तर ती बंद करण्याची मागणी करण्याचे काम प्रत्येक राष्ट्रभक्ताचे आहे. राहुल शेवाळी यांनी ही मागणी केली याचा मला अभिमान आहे. सावरकरांचा अपमान सरणाऱ्यांना सूडबुद्धीने न वागता न्यायबुद्धीने वागून राज्यसरकार धडा शिकवेल असेही रणजित देसाई म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा – सर, मी तुमचा नोकर होऊ इच्छितो; सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र राहुल गांधींनी दाखवलं वाचून

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -