Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी शिक्षण विभागाच्या ‘इंद्रधनुष्य २०२३’मध्ये होणार विद्यार्थ्यांचे कला, क्रीडा सादरीकरण

शिक्षण विभागाच्या ‘इंद्रधनुष्य २०२३’मध्ये होणार विद्यार्थ्यांचे कला, क्रीडा सादरीकरण

Subscribe

मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे ‘इंद्रधनुष्य २०२३’ हा कला आणि क्रीडा सादरीकरणांचा सांस्कृतिक सोहळा रविवार ५ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता वरळी येथील सरदार वल्लभाई पटेल इनडोअर स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे ‘इंद्रधनुष्य २०२३’ हा कला आणि क्रीडा सादरीकरणांचा सांस्कृतिक सोहळा रविवार ५ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता वरळी येथील सरदार वल्लभाई पटेल इनडोअर स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात २ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. (Art sports presentation of students will be held in Rainbow 2023 of Education Department)

संचलन, मानवंदना, तालबद्ध योगासने, लोकनृत्य, मानवी मनोरे असे विविध १५ प्रकार विद्यार्थ्यांमार्फत सादर करण्यात येणार आहेत. तसेच, या सोहळ्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार आदित्य ठाकरे, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल हे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

- Advertisement -

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांच्यासह महापालिकेचे विविध अधिकारी आदींची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे. तसेच, महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेऊन ज्यांनी यशाचे उच्च शिखर गाठून समाजामध्ये मानाचे स्थान मिळविले आहे, असे महापालिका शाळेतील १०० माजी विद्यार्थी, मागील तीन वर्षात महापालिका शाळांमध्ये माध्यमिक शालांत (१० वी) परीक्षेमध्ये सर्वाधिक गुणसंपादन केलेले ७५ विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित बिगर शासकीय संस्थांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली आहे.


हेही वाचा – आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये ६ हजार ५६९ जागा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -