Homeक्राइमRobbery : 1 कोटी 41 लाखांच्या हिर्‍यांसह कारागिराला अटक; चोरीनंतर मुंबईतून सुरत,...

Robbery : 1 कोटी 41 लाखांच्या हिर्‍यांसह कारागिराला अटक; चोरीनंतर मुंबईतून सुरत, मध्यप्रदेश, राजस्थानात पलायन

Subscribe

चोरीच्या 1 कोटी 41 लाख रुपयांच्या हिर्‍यांसह आरोपी नोकर असलेल्या कारागिराला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. सचिन जसवंत मकवाना असे या आरोपीचे नाव असून तो चोरीनंतर राजस्थानात पळून गेला होता.

मुंबई : चोरीच्या 1 कोटी 41 लाख रुपयांच्या हिर्‍यांसह आरोपी नोकर असलेल्या कारागिराला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. सचिन जसवंत मकवाना असे या आरोपीचे नाव असून तो चोरीनंतर राजस्थानात पळून गेला होता. तेथून त्याला चोरीच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले. मुंबईहून सुरत, मध्यप्रदेश आणि राजस्थान असा प्रवास करून आरोपीला पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (artisan arrested from rajasthan with diamonds worth 1 crore 41 lakhs)

या प्रकरणातील तक्रारदार वयोवृद्ध हिरे व्यापारी आहेत. त्यांच्यासह त्यांच्या मुलाचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे गोरेगाव येथे तर त्यांच्या मुलाचे वांद्रे येथील बीकेसी परिसरात एक कार्यालय आहे. गोरेगाव येथील कार्यालयात हिरे बनविले जात असून तिथे नऊ कारागीर कामाला आहेत. त्यात मूळचा गुजरातचा रहिवासी असलेल्या सचिन मकवाना याचा समावेश होता. 10 डिसेंबरला तो गोरेगाव येथील युनिटमध्ये आला होता. काही वेळ थांबून तो कार्यालयातील 1 कोटी 47 लाखांचे हिरे घेऊन पळून गेला. हा प्रकार नंतर मॅनेजर महेश काते यांच्या लक्षात येताच त्यांनी तक्रारदारांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी सचिनविरुद्ध गोरेगाव पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या सचिनचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – Samruddhi Expressway : एका रात्रीत तब्बल 50 गाड्यांचे टायर पंक्चर; प्रवासी झाले हैराण

शोधमोहिमे दरम्यान, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोरेगाव, मालाड, दहिसर, चारोटी टोल, भिलाड, वापी, सुरत, अहमदाबाद, पालनपूर, इडरपर्यंत त्याचा पाठलाग करत त्याला राजस्थान येथून अटक केली. तो सतत वाहन बदलून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता. चौकशीत त्यानेच हिर्‍यांची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे 77 हजाराची कॅशसह 1.40 कोटींचे 470 कॅरेटचे हिरे असा 1 कोटी 41 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले.

हेही वाचा – Nitesh Rane Controversy : राहुल – प्रियंका गांधी यांना निवडणुकीत मदत करणारे…राणे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य


Edited by : Ashwini A. Bhatavdekar