घरमुंबईपदयात्रेत कलाकार पैसे देऊन आणले; नितेश राणेंच्या आरोपावर पूजा भट्टचे सडेतोड उत्तर

पदयात्रेत कलाकार पैसे देऊन आणले; नितेश राणेंच्या आरोपावर पूजा भट्टचे सडेतोड उत्तर

Subscribe

एक गोष्ट जी बरेच लोक पाळत नाहीत, ती म्हणजे व्यक्तीची विवेकबुद्धी, असे म्हणत पूजा भट्ट यांनी राणेंना खडेबोल सुनावलेया आहेत.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत होरो यात्रा सुरु आहे. कन्याकुमारी मधून या पदयात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा महाराष्ट्रात येऊन तिचा राज्यातला प्रवास सुद्धा संपला आहे. राहुल गांधींची ही यात्रा महाराष्ट्रात येताच अनेक कारणांनी माध्यमांसमोर नेहमीच चर्चेचा विषय ठरली. अशातच राहुल गांधी यांनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे सर्वत्र संताप दिसत होता. दरम्यान या पदयात्रेत महाराष्ट्रातील अनेक बड्या व्यक्तींनी यात सहभाग घेतला होता. बॉलिवूड मधील काही कलाकारांनी सुद्धा राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभाग घेतला. भाजप कडून मात्र या पदयात्रेवर टीका करण्यात येत होती. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी कलाकारांना पैसे देण्यात आले असा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला होता. त्याच आरोपावर स्वत: यात्रेत सहभागी झालेली अभिनेत्री पूजा भट्ट हिने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

सध्या भारत जोडो यात्रा मध्य प्रदेश मध्ये आहे. यावरूनच भाजपचे आमदार नितेश राणे याने भारत जोडो यात्रेवर आरोप करत राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. तामिळनाडू मधून सुरु झालेल्या ‘भारत जोडो यात्रे’त अनेक कलाकरांनी हजेरी लावली. पण, या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी पैसे देऊन आणले जात आहे असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. “भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने नौंटकी सुरु आहे. पदयात्रेत १५ मिनिटे चालून राहुल गांधींना पाठिंबा देणारे कलाकार पैसे देऊन आणण्यात आले आहेत का?,” असा प्रश्न आमदार नितेश राणेंनी एक स्क्रीनशॉट शेअर करत उपस्थित केला होता.

- Advertisement -

नितेश राणेंच्या ट्विटला रिट्विट करत या यात्रेत सहभागी झालेली अभिनेत्री आणि दिग्दर्शक पूजा भट्टने हिने नितेश राणेंना सातेतोड उत्तर दिले आहे. ”त्यांना असा विचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी त्यांच्याबद्दल आदरही असायला हवा. पण, इतरांसोबत जगण्यापूर्वी स्वत:सोबत जगणे शिकायला हवे, एक गोष्ट जी बरेच लोक पाळत नाहीत, ती म्हणजे व्यक्तीची विवेकबुद्धी, असे म्हणत पूजा भट्ट यांनी राणेंना खडेबोल सुनावलेया आहेत.

नेमके काय म्हणाले नितेश राणे
नितेश राणेंनी व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये नाव किंवा नंबर दिसत नाही. त्यावर नितेश राणेंनी लिहले की, “भारत जोडो यात्रेत राहुल गांधींबरोबर चालण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले जातात, याचा हा पुरावा. सब गोलमाल है भाई… हा पप्पू कधी पास नाही होणार,” असा टोला नितेश राणेंनी राहुल गांधीना लगावला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही; आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढू – उपमुख्यमंत्री फडणवीस

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -