Aryan Khan bail plea rejected: जेलमध्ये आर्यन खानचा सकाळी ६ वाजता सुरू होणार दिवस, ७ वाजता नाश्ता…

Aryan Khan bail plea rejected: जेलमध्ये आर्यन खानचा सकाळी ६ वाजता सुरू होणार दिवस, ७ वाजता नाश्ता...
Aryan Khan bail plea rejected: जेलमध्ये आर्यन खानचा सकाळी ६ वाजता सुरू होणार दिवस, ७ वाजता नाश्ता...

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानला आर्थररोड जेलमध्ये मुक्काम करावा लागणार आहे. आज, शुक्रवारी किला कोर्टाने आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धमेचासह इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. काल, गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आर्यनचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु आता त्याला कोर्टाने मोठा झटका दिला. आता आर्यनला काही दिवस आर्थररोड जेलमध्ये काढावी लागणार आहेत.

आर्यनसह इतर आरोपींना जेलच्या पहिल्या मजल्यावरील बॅरक नंबर १ मध्ये ठेवले आहे. सध्या कोणालाही यूनिफॉर्म दिला नाही आहे. सर्वांना पाच दिवसांसाठी बॅरक नंबर १ मध्ये क्वारंटाईन ठेवले जाईल. जर कोणामध्ये कोरोनाची लक्षण दिसली, तर त्यांची कोरोना चाचणी केली जाईल. अलीकडे आर्यनसह आठ जणांनाचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. त्यामुळे यांना फक्त पाच दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाणार आहे. कोणालाही स्पेशल ट्रीटमेंट दिली जाणार नाही आहे. इतर जेलमध्ये असलेल्या आरोपींप्रमाणे त्यांना वागणूक मिळणार आहे.

एनसीबी कोठडीमध्ये आतापर्यंत आर्यनसह इतर आरोपींना त्यांच्या गरजेनुसार वागणूक दिली जात होती. परंतु जेलमध्ये गेल्यानंतर आर्यनसह कोणत्याही आरोपीला स्पेशल स्ट्रीटमेंट दिली जाणार नाही आहे. जर त्यांना घरातले जेवणं द्यायचे असले तरी त्यासाठी कोर्टाची परवानगी द्यावी लागणार आहे. कारण कोर्टाने कडक निर्देश दिले आहेत की, आरोपींना बाहेरचे जेवण देऊ नये. जे जेलचे रुटीन आहे, तेच त्यांना फॉलो करावे लागले.

काय असेल जेलचे रुटीन?

सकाळी ६ वाजता उठावे लागेल. त्यानंतर ७ वाजता नाश्ता मिळेल. यामध्ये शिरा आणि पोहे जेलमधील आरोपींना मिळतात. ११ वाजता जेवण दिले जाते. दिवसा आणि रात्रीच्या जेवणात चपाती, भाजी आणि भात, डाळ मिळेल.

आर्यनसह कोणत्याही आरोपीला जेलच्या आतमध्ये फिरण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही, कारण हे सर्वजण पाच दिवसांसाठी क्वारंटाईन असतील. जर आर्यनसह इतरांना जास्त जेवण पाहिजे असेल, तर त्यांना कँटीनमध्ये जास्त पैसे भरावे लागतील. हे पैसे मनी ऑर्डरद्वारे देऊ शकतात. संध्याकाळी ६ वाजता जेवण मिळते, परंतु काहींना हे जेवण ८ वाजता मिळते. त्यांना इतरांप्रमाणे आपले जेवणाचे ताट हातात घ्यावे लागेल. जेल अधिकाऱ्यांसाठी सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुले असते. त्यानंतर कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी दिली जात नाही.


हेही वाचा – Aryan Khan Bail Hearing: आर्यन खानसह इतर सात जणांची जेलमध्ये रवानगी, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला