घरताज्या घडामोडीAryan Khan Granted Bail:आर्यनची दिवाळी मन्नतवर, बापलेक एकत्र साजरा करणार वाढदिवस

Aryan Khan Granted Bail:आर्यनची दिवाळी मन्नतवर, बापलेक एकत्र साजरा करणार वाढदिवस

Subscribe

आर्यन खानचा वाढदिवसही १३ नोव्हेंबरला असल्याने वडिलांसह स्वत:चा वाढदिवस देखील आर्यन कुटुंबासोबत मन्नतवर साजरा करताना दिसणार आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला तब्बल २७ दिवसानंतर जामीन देण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुख खान आणि कुटुंबिय आर्यन खानच्या जामीनाच्या प्रतिक्षेत होते. आर्यन खानची दिवाळी देखील तुरुंगातच साजरी होणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र आता आर्यनच्या जामीनामुळे त्याची दिवाळी त्याचप्रमाणे वडिल शाहरुख खानचा वाढदिवसही मन्नतवर साजरा होणार आहे. २ नोव्हेंबर रोजी शाहरुख खानचा वाढदिवस असून १३ नोव्हेंबरला आर्यनचा देखील वाढदिवस आहे. त्यामुळे बाप लेक आता एकत्र वाढदिवस साजरा करताना दिसणार आहेत. आर्यन खानचा जामीन हा शाहरुखला वाढदिवसाला मिळालेले सर्वांत मोठे गिफ्ट असेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri Khan Team (@gauri_khan8)

- Advertisement -

 

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी त्याला न्यायालयीन कोठणी सुनावण्यात आली आणि ८ ऑक्टोबर रोजी आर्यनची आई गौरी खान हिचा वाढदिवस होता. मात्र त्याचदिवशी आर्यनची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. आई गौरी खान चा वाढदिवस साजरा करू न शकल्याचे दुःख आर्यन आहे. गौरी खान देखील तिच्या वाढदिवसाला मुलगा तिच्या जवळ नसल्याने फार भावूक झाली होती. वाढदिवसादिवशी आर्यन खान सुटून बाहेर येईल असे तिला वाटले होते. मात्र तिच्या पदरी निराशा आली. आईचा वाढदिवस साजरा करता आला नसला तरी वडिलांचा वाढदिवस त्याचप्रमाणे आर्यनची दिवाळी देखील मन्नतवर साजरी होणार आहे.

- Advertisement -

शाहरुख खानचा वाढदिवस त्याचा चाहत्यांसाठी खूप खास असतो. शाहरुखचे करोडो फॅन्स या दिवशी त्याला शुभेच्छा देण्यासाठी मन्नतबाहेर गर्दी करतात. वाढदिवसानिमित्त शाहरुख दरवर्षी आपल्या तिन्ही मुलांसोबत मन्नतच्या बाल्कनीत येऊन फॅन्सना आपली झलक दाखवत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. मात्र यावेळी शाहरुख वाढदिवसाला त्याची ही परंपरा तशीच सुरू ठेवेल का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतले त्यावेळी शाहरुख आणि आर्यन खानचे केवळ दोन मिनिटे फोनवर बोलणे होऊ शकले होते. त्यानंतर शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. त्यावेळी शाहरुख, गोरी आणि आर्यन खान एकमेकांना पाहून ढसाढसा रडले होते. आर्यनला जामीन मंजूर झाला असला तरी जामिनाबाबतचे सविस्तर आदेश शुक्रवारी काढले जाणार आहेत.


हेही वाचा – KP Gosavi Arrested : किरण गोसावीला पुणे पोलिसांकडून अटक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -