घरताज्या घडामोडीAryan khan drugs case आर्यन खानला अडकवण्याचा कट २७ सप्टेंबरलाच रचण्यात आला

Aryan khan drugs case आर्यन खानला अडकवण्याचा कट २७ सप्टेंबरलाच रचण्यात आला

Subscribe

क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणात बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या जामिनावर सुटला आहे. तर याप्रकरणात काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक रोज नवीन खुलासे करत असल्याने या प्रकरणाला वेगळे  वळण लागले आहे. याचदरम्यान, किरण गोसावीच्या जवळच्या असलेल्या सुनिल पाटील याचा मित्र विजय पगारे याने आर्यनला ड्रग्ज प्रकरणात गोवण्याचा प्लान २७ सप्टेंबरला नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आखण्यात आल्याचा खुलासा केला आहे.

पगारे याच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभारण्यात येत आहे. आर्यन क्रूजवर येणार याची माहिती एनसीबीला २७ सप्टेंबरलाच मिळाली होती का ? किरण गोसावी २७ सप्टेंबरच्या आधीपासूनच समीर वानखेडे यांच्या संपर्कात होता का ? २७ सप्टेंबरला नवी मुंबईतील एका हॉटेलचे दोन रुम का  कोणासाठी बुक करण्यात आले होते? त्याबदद्ल वानखेडे यांना माहित होते का ?त्याच रुममध्ये क्रूझ पार्टीवरील रेडचा प्लान आखण्यात आला होता का ?असे अनेक प्रश्न आता उभे राहीले आहेत.

- Advertisement -

तर दुसरीकडे याप्रकरणी वानखेडे यांनी सुरुवातीलाच सांगितले होते की या केससंदर्भात एक दिवसा आधीच गोसावीबरोबर त्यांची ओळख झाली होती. पण पगारे याने मात्र वेगळाच घटनाक्रम सांगितला आहे. पगारे हा या प्रकरणात मुख्य भूमिकेत असलेल्या सुनिल पाटील याच्या जवळचा आहे. तसेच गोसावीशी त्याचे मैत्रीचे संबंध आहेत. यामुळे गोसावीच्या जवळचे कोण हे त्याला चांगलेच माहित आहे.

विजय पगारे यांनी नेमकं काय सांगितल
पगारे याने दिलेल्या माहितीनुसार २७ सप्टेंबरला नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये दोन रुम बुक करण्यात आले होते. एका रुममध्ये तो स्वत:, गोसावी आणि सुनील पाटील होते. तर दुसऱ्या रुममध्ये मनीष भानुशाली एका तरुणीबरोबर होता. दोन तासानंतर भानुशाली त्या रुममधून बाहेर पडला. पण जाताना त्याने त्याच्या हाती मोठा गेम लागल्याचे सांगितल्याचे पगारे यांनी म्हटले आहे. मनीष भानुशाली भाजपशी संबंधित असून गोसावी आणि त्याचे जवळचे संबंध आहेत. तर पगारे याच्या या खुलाशानंतर क्रूझ पार्टीवरील रेडचा प्लान याच लोकांनी आखल्याचे स्पष्ट होत असले तरी त्यामागचा खरा सूत्रधार कोण हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच किरण गोसावीने आर्यनबरोबर काढलेल्या सेल्फीमुळेच सगळा प्लान फसल्याचे पगारे याने सांगितले आहे. कारण त्याच सेल्फीमुळे आर्यन एनसीबीच्या ताब्यात असल्याचे समोर आले होते.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -