घरताज्या घडामोडीAryan Khan ड्रग्ज प्रकरणात २ आरोपींना जामीन मंजूर

Aryan Khan ड्रग्ज प्रकरणात २ आरोपींना जामीन मंजूर

Subscribe

ड्रग्ज प्रकरणातील आर्यन खान सोबत इतर आरोपींच्या जामीन अर्जावर बुधवारी बॉम्बे हायकोर्टात सुनावणी होणार आहे

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) विशेष एनडीपीएस कोर्टाकडून (NDPS special court)  मनीष राजगरिया (Manish Rajagaria)  आणि अविन साहू (Avin Sahu)  या दोन आरोपींना  जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनीष राजगरियासोबत अविन साहूला देखील स्टेशन एनडीपीएस कोर्टाकडून जामीन देण्यात आला आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणात पहिलाच जामीन असून व्ही व्ही पाटील यांच्या खंडपीठाकडून जामीन मंजूर करण्यात आला असून मनीष राजगरिया आणि अविन साहू हे क्रूझवरील गेस्ट होते त्यांना एनसीबीने अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात ११ नंबरचा आरोपी मनीष राजगरियाजवळ २.४ ग्रामचा गांजा सापडल्याने त्याला अटक केली होती. मनीषचे वकील अजय दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० हजारांच्या बॉन्डवर त्याला जमीन देण्यात आलेला आहे. ड्रग्ज प्रकरणातील आर्यन खान सोबत इतर आरोपींच्या जामीन अर्जावर बुधवारी बॉम्बे हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

एनसीबीने केलेल्या दाव्यानुसार, आरोपी अविन साहू याच्याकडून कोणतेही ड्रग्ज हस्तगत करण्यात आले नव्हते तर मनीष राजगरियाकडून २.४ ग्राम गांजा हस्तगत करण्यात आला होता. हे दोघेही ओडिशाच्या राउरकेला येथील राहणारे आहेत. मनीष राजगरियाचा रघुनाथपल्ल येथे स्पंज आयरन प्लांट आहे. तर  अविन साहूचे राउरकेल येथे त्यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. तो ज्वेलरीच्या व्यवसायानिमित्त मुंबई,दुबई,अमृतसर यारख्या ठिकाणी प्रवास करत असतो. अविनच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्सवाच्या निमित्ताने अविन दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत दागिने खरेदी करण्यासाठी गेला होता. अविनने ड्रग्जचे सेवन केले नसल्याचा दावा त्याचे वडील आणि कुटुंबियांनी केला आहे.

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज बॉम्बे हायकोर्टात सुनावणी सुरू होती. मात्र आजच्या सुनावणीवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. २७ ऑक्टोबर म्हणजेच बुधवारी यासंबंधी पुन्हा सुनावणी होणार आहे. २० ऑक्टोबर रोजी देखील आर्यन खानसह अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धमेचा हिचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. गेली २३ दिवस आर्यन खान न्यायलयीन कोठडीत आहे. ८ ऑक्टोबरला त्याला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – Aryan Khan Bail Hearing: आर्यनची आजची रात्र तुरुंगात; जामीनावर उद्या सुनावणी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -