घरताज्या घडामोडीAryan Khan Drugs Case: दुसऱ्या दिवशी अनन्या पांडेची NCB कडून चार तास...

Aryan Khan Drugs Case: दुसऱ्या दिवशी अनन्या पांडेची NCB कडून चार तास चौकशी

Subscribe

आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्या चॅटींगमध्ये आर्यन खान अनन्या पांडे हिच्याशी गांज्या विषयी बोलत होता

आर्यन खान व्हाट्स अँप चॅट प्रकरणी एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडे हिला चौकशीसाठी बोलावले होते. त्याप्रमाणे आज सलग दुसऱ्या दिवशी अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिली होती. आज एनसीबीकडून अनन्याची सलग चार तास कसून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत तिच्याकडे असलेल्या व्हाट्सएप चॅट संदर्भात काही प्रश्न विचारले गेले. त्याचप्रमाणे तिचा या ड्रग्स प्रकरणाशी काय संबंध आहे? याबाबत चौकशी करुन तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. दुपारी २ वाजता अनन्या ही वडील चंकी पांडे सोबत एनसीबी कार्यालयात उपस्थित राहिली होती.

आर्यन खानच्या व्हॉट्स अँप चॅट प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिला एनसीबीकडून काल समन्स बजावण्यात आले. त्याचप्रमाणे काल अनन्या हिच्या अंधेरी येथील राहत्या घरी एनसीबीकडून छापेमारी करण्यात आली. त्यावेळीस एनसीबीकडून अनन्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला. आर्यन खानसोबत ड्रग्ज संदर्भात काही व्हॉट्स अँप चॅट्स एनसीबीच्या हाती लागले होते. एनसीबीला आतापर्यंत आर्यन आणि अनन्या यांच्या व्हॉट्स अँप चॅट्स मिळाले असले तरी अनन्याने आर्यनला ड्रग्ज पेडलरचे नंबर दिले असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाही.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्या चॅटींगमध्ये आर्यन खान अनन्या पांडे हिच्याशी गांज्या विषयी बोलत होता. तर अनन्याने मी काहीतरी सोय करते असे आर्यनला म्हटले होते. एनसीबीने हे चॅट्स अनन्याला दाखवले असता तिने मी आर्यनची थट्टा करत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे अनन्याने मी केवळ आर्यनसोबत सिगारेटविषयी बोलले होते. आम्ही ड्रग्ज विषयी काहीही बोललेलो नाही,असे सांगितले.


हेही वाचा – Ncb -अन्यनानंतर एनसीबीच्या टार्गेटवर आहेत ‘हे’ स्टार किड्स

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -