घरट्रेंडिंगNCB कार्यालयाबाहेर वडिलांच्या प्रतापाने अरबाज मर्चंटचा हात कपाळावर, व्हिडिओ व्हायरल

NCB कार्यालयाबाहेर वडिलांच्या प्रतापाने अरबाज मर्चंटचा हात कपाळावर, व्हिडिओ व्हायरल

Subscribe

NCB कार्यालयातून बाहेर पडताच अरबाज मर्जेंट वडिलांवर भडकला

ड्रग्ज क्रूझ प्रकरणात आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट शुक्रवारी एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिला होता. यावेळी अरबाजचे वडिल असलम मर्चंट देखील तिथे उपस्थित होते. अरबाज आणि त्याचे वडील एनसीबी कार्यालयातून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ समोर असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वडिलांनी केलेल्या प्रतापामुळे अरबाज मात्र चांगलाच वैतागल्याचे दिसत आहे. वैतागलेल्या अरबाजने थेट कपाळावरच हात मारला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अरबाज एनसीबी कार्यालयातून बाहेर पडत आहे. तिथे त्याचे वडील देखील उपस्थित आहेत. एनसीबी कार्यालयातून बाहेर पडताच अरबाजचे वडील पापाराझींच्या फोटोसाठी थांबतात आणि अरबाजला देखली थांबवतात. अरबाज काही सेकंदासाठी थांबतो. वडील त्याला फोटोसाठी पोझ द्यायला सांगताच अरबाज समोर असलेल्या पापाराझींच्या कॅमेरा बघतो आणि डोक्याला हात मारत ‘स्टॉपिड डॅड’ असे म्हणत गाडीच्या दिशेने निघून जातो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ड्रग्ज क्रूझ प्रकरणात आर्यन खानसह अरबाज मर्जंट आणि इतर आरोपींना जामीन मिळाला असला तरी त्यांना आठवड्याच्या शुक्रवारी एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावे लागते. अरबाज नेहमीप्रमाणेच चौकशीसाठी गेला होता. चौकशीमुळे हैराण झालेला अरबाज वडिलांनी एनसीबी कार्यालयाबाहेर केलेल्या प्रतापामुळे आणखी हैराण झाला. व्हिडिओ अरबाजचे वडील त्याला हाताला धरुन फोटो काढण्यासाठी उभे करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून अनेक प्रतिक्रीया आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – नवा व्हेरियंट Omicronमुळे भारत अलर्ट; १२ देशांतील प्रवाशांचे स्क्रीनिंग केलं बंधनकारक

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -