घरताज्या घडामोडीCruise Drug Case : आर्यन खानला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Cruise Drug Case : आर्यन खानला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Subscribe

सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामीन अर्जावर हायकोर्टात युक्तीवाद चालला. आज हायकोर्टात एनसीबीच्या वतीने एएसजी अॅडव्होकेट अनिल सिंग यांनी बाजू मांडली.अरबाजकडे ड्रग्ज होत हे आर्यनला माहित नव्हत. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाही. शिपवर जवळपास १३०० जण होते. पण आर्यनला अरबाझ आणि अचित व्यतिरिक्त शिवाय कोणीच ओळखीचे नव्हते. अरबाझ व्यतिरिक्त इतर कोणाशीही आर्यनचा संबंध नसल्याची बाजू मुकुल रोहतगी यांनी मांडली. त्यामुळे षडयंत्रासाठी कोणतेही भक्कम पुरावे नसल्याचे ते म्हणाले. षडयंत्र हे सिद्ध करण्यासाठी कठीण असले तरीही पुरावे हेच बोलके आहेत, अशीही बाजू त्यांनी मांडली. आर्यनला तब्बल २५ दिवसानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजुर झाला. आर्यनसोबतच अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा यांनाही जामीन मंजुर करण्यात आला. याबाबतची सविस्तर आदेश शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे.

तिन्ही याचिकाकर्त्यांना कोर्टाने जामीन मंजुर केला. कोर्टाने तीन दिवस हे प्रकरण एकून जामीन दिला. सविस्तर आदेश उद्या शुक्रवारी देण्यात येणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांनाही शुक्रवारी किंवा शनिवारी उच्च न्यायालयाकडून निकालातून घरी पाठवण्यात येईल, असे आर्यनचे वकील मुहुल रोहतगी यांनी सांगितले. तिघांचे जामीन अर्ज मंजूर केल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले. तिघांच्या जामीन अर्जावर आज सायंकाळीही आदेश येऊ शकतो.

- Advertisement -

 

- Advertisement -

आर्यन कधी घरी जाणार ?

तिघांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन देताना अर्जावर कोणत्या अटी शर्थी घालण्यात आल्या आहेत, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. जामीनासाठी अटी शर्थींसाठी भारत सोडून न जाणे, पुराव्यांशी छेडछाड न करणे, साक्षीदारांवर प्रभाव न टाकणे आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे स्पष्ट करण्यात आले आहे. दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहण्याची अट टाकण्यात आल्याचे कळते. याच आधारावर शुक्रवारी या तिघांनाही न्यायालयाकडून सोडण्यात येईल, असे आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील सविस्तर आदेश मिळाल्यानंतरच या तिघांची सुटका करण्यात येईल. न्यायालयाने जामीन मंजुर करताना किती रकमेच्या आधारावर हा जामीन मंजूर केला हे अद्यापही स्पष्ट केले नाही. त्यामुळे शुक्रवारी आदेश मिळाल्यानंतरच याबाबतची स्पष्टता येईल असेही रोहतगी म्हणाले.

जामीनासाठीच्या अटी काय ?

आर्यन खानला २ ऑक्टोबरला क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात ड्रग्जशी संबंधित कनेक्शन आढळल्याने एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला एनसीबी तसेच न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर आर्यनला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. मुंबई दंडाधिकारी कार्यालय, विशेष एनडीपीएस कोर्टाकडून जामीन नाकारला गेल्यानंतर आर्यनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आर्यनकडून मुंबई उच्च न्यायालयात मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडील. सलग तीन दिवस चाललेल्या युक्तीवादामध्ये आर्यनचा कोणत्याही कटात सहभाग नव्हता. तसेच त्याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नव्हते, अशी बाजू मुकुल रोहतगी यांनी मांडली होती. दुसरीकडे एनसीबीच्या वतीने या संपुर्ण वॉट्स एप चॅटचा संपर्क हा आंतरराष्ट्रीय ड्रग्जशी असल्याचे वारंवार सांगण्यात आले होते. तसेच आर्यन गेल्या दोन वर्षापासून ड्रग्ज घेत असल्याचा दावाही रोहतगी यांनी केला होता.

क्रूझ ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान ला गुरुवारी उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. २ नोव्हेंबर रोजी शाहरुख खान चा वाढदिवस असून आर्यन खान वडिलांचा वाढदिवस मन्नत वर साजरा करणार आहे, तसेच आर्यन खान याचा वाढदिवस १३ नोव्हेंबर रोजी आहे. मात्र आई गौरी खान चा वाढदिवस साजरा करू न शकल्याचे दुःख आर्यन आहे.गौरी खान हीचा ८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस झाला त्या वेळी आर्यन खान याला ७ ऑक्टोबर रोजी न्यायालयीन कोठडी सुमावण्यात आली होती व ८ ऑक्टोबर रोजी त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती


हेही वाचा – Cruise Drugs Case: आर्यन खान प्रकरणात मनीष भांगळेची एन्ट्री, व्हॉट्सॲप हॅकींगसाठी ५ लाखांची ऑफर

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -