Mumbai Cruise Drugs Bust: पॅन्ट किंवा इनरवेअर नाही तर ‘या’ ठिकाणी लपवले होते आर्यनने ड्रग्ज

आर्यनकडून एनसीबीने १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आणि MDMA च्या २२ गोळ्या जप्त

Aryan khan hide drugs in eye lens box
Aryan Khan Arrest: पॅन्ट किंवा इनरवेअर नाही तर 'या' ठिकाणी लपवले होते आर्यनने ड्रग्ज

मुंबहून गोव्याला जाणाऱ्या आलीशान क्रूझवर एनसीबीने (NCB) छापेमारी करुन मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला. क्रूझवर ड्रग्जचा साठा कशाप्रकारे आणण्यात आला हे जाणून घेण्यासाठी एनसीबीने आर्यन खानसह (Aryan khan) इतर आरोपींची कसून चौकशी केली असता क्रूझवर ड्रग्ज आणण्यासाठी पुरुष आणि महिलांच्या अंतर्वस्रांचा प्रामुख्याने वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे लेडिज हॅंड बॅगचे हँडल्स, पॅन्टचे पट्टे यामधून देखील ड्रग्ज क्रूझवर आणण्यात आले होते. छापेमारीत MDMA/ एक्स्टसी, कोकेन, MD (मेफेड्रोन) आणि चरस सारख्या विविध वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला. तर आर्यनकडून एनसीबीने १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आणि MDMA च्या २२ गोळ्या जप्त केल्या आहेत.

आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर त्याची चौकशी करत असताना त्याने ड्रग्जचे सेवन केल्याचे कबूल केले. आर्यनने ड्रग्ज कशाप्रकारे क्रूझवर आणले असा प्रश्न आर्यनला विचारला असता धक्कादायक माहिती समोर आली. आर्यन अरबाज नावाच्या एका मित्रासोबत क्रूझवर आला होता. आर्यनने ड्रग्ज त्याच्या डोळ्यांच्या लेन्स बॉक्समध्ये ठेवल्याचा खुलासा केला. तर त्याचा मित्र अरबाज याच्या बुटांमध्ये एनसीबीने ड्रग्ज जप्त केले होते. त्याचप्रमाणे त्याच्यासोबत असलेल्या इतरांनी सॅनिटरी नॅपकिन आणि औषधांच्या डब्ब्यांमध्ये ड्रग्ज आणि गांजा लपवला असल्याचे उघड झाले आहे.

एनसीबीने आर्यनसह अनेकांना ड्रग्ज प्रकरणी रंगे हाथ ताब्यात घेतले. एनसीबीने आर्यनचा फोन तपासला असता तो अनेक ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात असल्याचे समोर आले. आर्यन गेल्या ४ वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करत होता. मूनमून धमेचा,नुपूर सारिका,इस्मित सिंग,मोहक जैस्वाल,विक्रांत चोकेर,गोमित चोप्रा,आर्यन खान,अरबाझ मर्चंट यांना आज किल्ला कोर्टात दाखल करण्यात आले आहे. आर्यनचे वकील सतीश माने शिंदे यांनी आर्यनच्या जामिनासाठी अर्ज देखील दाखल केला आहे. आज आर्यनला जामीन मिळणार की पुन्हा कोठडी होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा – NCBच्या चौकशीत सतत रडतोय Aryan, शाहरुख सोबत केवळ २ मिनिटं झालं बोलणं