घरताज्या घडामोडीAryan khan केसमधील एनसीबीचा प्रायव्हेट डिटेक्टिव किरण गोसावीच आहे वॉन्टेड, ४ गुन्हे...

Aryan khan केसमधील एनसीबीचा प्रायव्हेट डिटेक्टिव किरण गोसावीच आहे वॉन्टेड, ४ गुन्हे आहेत दाखल

Subscribe

आर्यन खान Aryan khan  क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात भाजपच्या दोन कार्यकर्तांचे नाव समोर आल्याने आता या हायप्रोफाईल प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मनीष भानुशाली आणि स्वत:ला प्रायव्हेट डिटेक्टिव म्हणवणाऱ्या किरण गोसावी यांनी दिलेल्या माहितीवरच एनसीबीने क्रूजवर छापा घातला होता. पण आता एनसीबीची मदत करणाऱ्या गोसावी याच्यावरच चार गुन्हे दाखल झाल्याचे समोर आले असून फसवेगिरी प्रकरणी तो वॉन्टेड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आर्यनला एनसीबीने ताब्यात घेतल्यानंतर किरण गोसावी याचा आर्यनबरोबरचा सेल्फी सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यामुळे कायदा धाब्यावर बसवून आरोपीसोबत सेल्फी काढणारा हा अधिकारी कोण यावरही चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर तो एनसीबीचा अधिकारी नसल्याचे सांगण्यात आले होते. यावर आपण प्रायव्हेट डिटेक्टिव असल्याचे गोसावी यांना म्हटले होते. पण आता गोसावीवरच २०१८ मधील एका प्रकरण फसवेगिरी प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले असून तो वॉन्टेड असल्याचे खुद्द पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे.

- Advertisement -

तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते नवाब मलिक यांनीही गोसावी आणि भानुशाली यांचे भाजपशी संबंध असल्याचा दावा केला होता. क्रूझवरील छापेमारीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत या दोघांना पाहण्यात आले होते. तसेच स्वत:ला मलेशियाचा गुप्तहेर म्हणवून घेणाऱ्या गोसावीवर अनेक गुन्हे दाखल असून त्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्याशी जवळचे संबंध असल्याचेही मलिक यांनी म्हटले होते.

- Advertisement -

गोसावी याच्यावर वेगवेगळ्या प्रकरणी कमीत कमी ४ गुन्हे दाखल आहेत

यातील एक गुन्हा २००७ साली अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये , २ गुन्हे २०१५ मध्ये आणि २०१६ साली ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात, तर १ गुन्हा २०१८ साली पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होते. या प्रकरणात कसबा पेठेतील चिन्मय देशमुख याने गोसावी विरोधात २९ मे २०१८ साली एफआयआर केली होती. यात गोसावीने सोशल मीडीयावर मलेशियात नोकरी देण्याची जाहीरात दिली. पण ३ लाख रुपय घेऊनही नोकरी दिली नाही असा आरोप देशमुख याने केला होता.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -