घरताज्या घडामोडीAryan Khan Bail : आर्यन खान प्रकरणात जुही चावलाची प्रतिक्रिया, म्हणाली...

Aryan Khan Bail : आर्यन खान प्रकरणात जुही चावलाची प्रतिक्रिया, म्हणाली…

Subscribe

ड्रग्ज क्रूझ पार्टी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केलेल्या आर्यन खानला तब्बल २६ दिवसांनंतर मोठा दिलासा मिळाला. पण आर्यनला आज शुक्रवारची रात्रही  आर्थर रोड जेलमध्येच घालवावी लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून न्यायलयीन कोठडीत असलेला आर्यन खान आर्थर रोड जेलमधून आज शुक्रवारी बाहेर पडेल, अशी अपेक्षा होती. पण जेल प्रशासनाने मात्र कोणासाठीही नियम बदलण्यात येणार नसल्याचे जेल अधिक्षकांनी स्पष्ट केले.

काय म्हणाली जुही चावला ?

आर्यनच्या जामीन अर्जावर याआधी दोनवेळा आर्यनच्या जामीन अर्ज हा कनिष्ठ कोर्टांनी फेटाळला होता. आर्यन खानच्या जामीन अर्जावर बॉलिवुड अभिनेत्री जुही चावलाने जामीन म्हणून सह्यांची औपचारिकता पूर्ण केली.मी खूपच खूश आहे. आता सगळी प्रक्रिया ही एकदाची संपली आहे. आर्यन खान तुरूंगातून लवकरच बाहेर पडेल. मला वाटते की हा सर्वांसाठी मोठा दिलासा असेल, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री जुही चावलाने दिली. आर्यन खानला जामीन देण्यासाठी जुही चावला सत्र न्यायालयात हजर झाली होती. आर्यन खानच्या जामीन अर्जावर जामीनासाठीची व्यक्ती म्हणून तिने स्वाक्षरी केली. आर्यन खानला अटी शर्थींसह १ लाख रूपयांच्या बॉंडवर जामीन देण्यात आला आहे.

- Advertisement -


त्यानंतर जामीनाची ऑर्डर घेऊन आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे हे आर्थर रोड जेलकडे रवाना झाले. आर्यनला आर्थर रोड येथे घेण्यासाठी शाहरूख खान स्वतः हजर होतील असे बोलले जात होते. ठराविक अटी शर्थींसह तसेच १ लाख रूपयांच्या बॉंडवर आर्यनचा जामीन हायकोर्टात मंजूर झाला. त्यानंतर हायकोर्टात या अटी शर्थी वाचूनही दाखवण्यात आल्या. आर्यन खान आणि शाहरूखला पाहण्यासाठी आर्थर रोड जेलबाहेर बघ्यांची तसेच प्रसिद्धी माध्यमांच्या कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळेच आर्थर रोड जेलबाहेर मोठा पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला होता.

आर्थर रोड जेलबाहेरच्या गर्दीसारखीच मोठी गर्दी ही शाहरूखचा वांद्रे येथील बंगला असलेल्या मन्नतबाहेरही पहायला मिळाली. शाहरूख्या घराबाहेरही मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. पाच वाचता आर्यनच्या जामीन अर्जावर स्वाक्षरीची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी जुही चावला पोहचली होती. त्यानंतरच्या औपचारिकता करण्यासाठी आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे हे सत्र न्यायालयातून आर्थर रोड तुरूंगाकडे जामीन अर्ज घेऊन निघाले. तुरूंगात जामी अर्ज सादर करण्याची वेळ ही ५.३० वाजेपर्यंतची होती. ऑर्डरची वेळ संपल्यानंतरही जामीन देण्यात येणार का ? याबाबतचा सस्पेन्स होता. पण ही वेळ ७ वाजेपर्यंत असल्याचे त्यानंतर स्पष्ट होऊ लागले. आर्यनला आर्थर रोड येथून मन्नतवर घेऊन जाण्यासाठी शाहरूखही आर्थर रोड जेल येथे पोहचणार असल्याची माहिती येत होती. सत्र न्यायालयातून सतीश माने शिंदे हे आर्थर रोडला जामीनाचा अर्ज घेऊ येणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर मात्र आर्यनचा जामीन अर्ज हा ईमेलद्वारेही पाठवण्याचा पर्याय असल्याची माहिती समोर आली.

- Advertisement -

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला काल, गुरुवारी हायकोर्टातून जामीन मिळाला. त्यानंतर आज, शुक्रवारी आर्यनच्या जामिनाबाबत पाच पानी आदेश जारी करण्यात आले आहेत (Bombay HC releases 5-page order with bail conditions). त्यामुळे आज आर्यन खानची २६ दिवसांनंतर आर्थर रोड जेलमधून सुटका होऊ शकते. आर्यनसह तीन आरोपींचा जामीन अर्जाला काल मुंबई हायकोर्टाने मंजूरी दिली होती. या सर्व आरोपींना अटीशर्थींसह जामीन मंजूरी करण्यात आला आहे. आर्यन खानसह, मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मंजूर करण्यात आला होता. पण अरबाज आणि मूनमूनची आर्थर रोडमधून सुटका शनिवारी होणार असल्याचे कळते.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -