Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन फरहान-शिबानीच्या पार्टीमध्ये Aryan, Suhana अन् Gauri ची एन्ट्री

फरहान-शिबानीच्या पार्टीमध्ये Aryan, Suhana अन् Gauri ची एन्ट्री

Subscribe

फरहान-शिबानीच्या पार्टीमध्ये दिपीका पादुकोण, करीना कपूर सह लावली अनेकांनी हजेरी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. १९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी दोघांनी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थित लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचं दरम्यान नवविवाहित फरहान आणि शिबानीसाठी प्रोड्यूसर रितेश सिधवानी यांनी छोटेखानी पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

- Advertisement -

दीपिका पादुकोण, मलाइका अरोरा , करीना कपूर, करिश्मा कपूर, रिया चक्रवर्ती यांसारखे अनेक सेलिब्रिटी या पार्टीत उपस्थित होते. विशेष म्हणजे बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानची फॅमिलीही यावेळी हजर होती. शाहरूख खानची पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना यांनी देखील या पार्टीत उपस्थिती दर्शवली. मात्र शाहरूख कुठे दिसला नाही. मात्र फरहान अख्तर- शिबानीच्या या पार्टीमध्ये सुहाना, गौरी आणि आर्यन भाव खाऊन गेले आहेत. पार्टीमधील त्यांच्या कडक एन्ट्रीमुळे साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

आर्यन खानला काही दिवसांपूर्वी ड्रग्स प्रकरणात अटक झाली होती. अटकेनंतर पहिल्यांदाचं आर्यन बॉलिवूडमधल्या पार्टीमध्ये स्पॉट झाला आहे. अलीकडेच आर्यन खान बहीण सुहानासोबत काही दिवसांपूर्वी IPL च्या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी झाला होता.

- Advertisement -

सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत, यामध्ये आर्यन  ब्लॅक ट्राउजर, व्हाइट टी-शर्ट आणि डेनिम जॅकेटमध्ये दिसून आला. तर सुहाना आणि गौरी खानने ब्लॅक ड्रेसमध्ये दिसल्या, सध्या तिघांचे या पार्टीतील व्हिडिओ आणि अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


‘चाकदा एक्सप्रेस’साठी Anushka Sharma करतेय गोलंदाजीचा सराव


- Advertisment -