घरताज्या घडामोडीCruise Drugs Case: आर्यन खानचा जामीन फेटाळला; वकिलांची हायकोर्टात धाव

Cruise Drugs Case: आर्यन खानचा जामीन फेटाळला; वकिलांची हायकोर्टात धाव

Subscribe

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज आजही सेशन कोर्टाने फेटाळला आहे. आर्यन खानसह इतर दोन अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यामुळे शाहरुख खान आणि गौरी खानच्या पदरी पुन्हा निराश पडली आली. आर्यन खानचे वकील आता उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.

यापूर्वी १४ ऑक्टोबरला सेशन कोर्टाच्या दोन्ही बाजूच्या वकिलांची बाजू ऐकून झाल्यानंतर न्यायाधीश व्ही.व्ही पाटील यांनी जामीन अर्जांवर निर्णय राखून ठेवत २० ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. याआधीच्या सुनावणीमध्ये एनसीबीची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅट अहवाला देत काही मुद्दे कोर्टासमोर मांडले. यात आरोपीचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा मुद्दा ठळकपणे मांडला होता. त्यासाठीच आर्यनला जामीन मिळाल्यास पुराव्यात छेडछाड होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. तसेच एनसीबीने देशभरातील ड्रग्ज रॅकेटचा उच्चाटन करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आरोपींकडून आधिकाधिक माहिती मिळवणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. त्यावर आर्यनचे वकील अमित देसाई यांनी आर्यन हा चांगल्या कुटुंबातील तरुण असून देश सोडून पळून जाणारा नाही सांगितले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Cruise Drugs Case: ड्रग्ज संबंधित बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यनने चॅट केल्याचा खुलासा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -