घरCORONA UPDATEकेंद्राची मार्गदर्शिका जाहीर; यावर राहणार निर्बंध कायम, तर यांना वगळले लॉकडाऊनमधून!

केंद्राची मार्गदर्शिका जाहीर; यावर राहणार निर्बंध कायम, तर यांना वगळले लॉकडाऊनमधून!

Subscribe

केंद्रीय गृह मंत्रालयाने नवी मार्गदर्शके आज जाहीर केल्या आहेत. येत्या २० एप्रिलनंतर देशात कुठे आणि कोणत्या आर्थिक गोष्टी करण्यासाठी परवानगी असेल, याची यादीच मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी राष्ट्राला संबोधित करताना २० एप्रिलपासूनच्या नवीन मार्गदर्शके सरकार जाहीर करणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने नवी मार्गदर्शके आज जाहीर केल्या आहेत. येत्या २० एप्रिलनंतर देशात कुठे आणि कोणत्या आर्थिक गोष्टी करण्यासाठी परवानगी असेल, याची यादीच मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. ही मार्गदर्शके देशातील शेतकऱ्यांना तसेच हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांसाठी थोडासा दिलासा देईल, अशी अपेक्षा आहे. त्यासोबतच लॉकडाऊनच्या काळात कोणत्या गोष्टींसाठी मज्जाव किंवा प्रतिबंध असेल याचाही खुलासा या मार्गदर्शकांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

या गोष्टींवरील बंधने कायम

देशात हवाई प्रवास, रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीचा प्रवास, शाळा आणि प्रशिक्षण संस्था चालवणे, औद्योगिक आणि वाणिज्यिक गोष्टी, हॉस्पिटॅलिटी सर्व्हीसेस, सिनेमागृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, थिएटर्स आदींवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच कोणतेही सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रम, धार्मिक प्राथर्नास्थळे खुली करणे तसेच लोकांना प्रार्थनेसाठी बोलावणे यासारख्या गोष्टींसाठीची बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

या गोष्टींसाठी परवानगी

येत्या २० एप्रिलपासून कृषी तसेच संबंधित कामांची सुरूवात व्हावी म्हणून काही गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामधून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आपल्या संपूर्ण कार्यक्षमतेने सुरू होईल, असे अपेक्षित आहे. रोजंदारीवर तसेच मजुरीचे काम करणाऱ्यांसाठी रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशातून या कामांना सुरूवात करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. काही उद्योगातील कामांसाठीही या मार्गदर्शकांनुसार मंजुरी देण्यात आली आहे. पण त्यासाठी अत्यावश्यक अशी गुणवत्तापूर्ण कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर करण्यात आली आहे.

खालील आर्थिक कामांसाठी मार्गदर्शके जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या कृषी क्षेत्रासाठी तसेच रोजंदारीवरील काम करणाऱ्यांना फायदा होईल. पण या कामादरम्यान कोरोनाचा प्रसार होणार नाही याची खबरदारी राज्य, जिल्हा प्रशासनाला घ्यायची आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे कन्टेन्टमेंट झोन आहेत, अशा ठिकाणी ही मंजुरी देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

२० एप्रिलनंतर या गोष्टींसाठी परवानगी

  1. अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक नसलेल्या मालवाहतुकीसाठी परवानगी
  2. शेतकऱ्यांच्या कामांमध्ये कृषीसंबंधित गोष्टींची खरेदी, शेतमालाची विक्री (मंजुर केलेल्या मंडई क्षेत्रातच), शेतमालाचे विकेंद्रीकरण, खतांची, कीटकनाशकांची आणि बियाणे खरेदी. सागरी तसेच विशिष्ट क्षेत्रातील मासेमारी, कुक्कुटपालनाशी संबंधित कामे, दूध पुरवठा, दुधावर आधारीत उत्पादने, पोल्ट्री, दुभती जनावरे, चहा कॉफी, रबर उत्पादन यासाठीच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे.
  3. ग्रामीण भागात चालणाऱ्या इंडस्ट्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये फुड प्रोसेसिंग इंडस्ट्री, रस्तेबांधणी, जलसंधारण प्रकल्प, इमारत आणि औद्योगिक प्रकल्पांची ग्रामीण भागातील कामे, मनरेगाची कामे, जलसंधारण आणि जलसंपदा विभागाची कामे, कॉमन सर्व्हीस सेंटरची कामे यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना काम मिळेल, असे अपेक्षित आहे.
  4. एसईझेड, इंडस्ट्रिअल इस्टे, इंडस्ट्रिअल टाऊनशीप याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवून काम करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठीचीही एसओपी जाहीर करण्यात आली आहे. आयटी हार्डवेअरची निर्मिती, अत्यावश्यक सेवेतील गोष्टींचे पॅकेजिंग करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोळसा, मिनरल्स, इंधन निर्मितीच्या गोष्टींसाठीही परवानगी देण्यात आली आहे.
  5. डिजिटल इकॉनॉमीच्या माध्यमातून ई कॉमर्स ऑपरेशन, आयटी ऑपरेशन, आयटी एनेबल सेवा, डेटा आणि कॉल सेंटर (शासकीय कामांसाठी), ऑनलाईन प्रशिक्षण आणि दूरस्थ शिक्षणासाठीही मंजुरी देण्यात आली आहे.

वाणिज्यिक आणि खासगी आस्थापना

  • प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया, ब्रॉडकास्टिंग, डीटीएच आणि केबल सेवा
  • ई कॉमर्स कंपन्या (शासकीय मंजुरीनेच)
  • कुरिअर सेवा
  • कोल्ड स्टेरोज आणि वेअरहाऊस सेवा
  • खासगी सिक्युरीटी सेवा (ऑफिस आणि रहिवासी संकुलासाठी)
  • हॉटेल्स, होमस्टे, मॉटेल्स ज्यामध्ये लोक अडकले आहेत अशा ठिकाणच्या सेवा
  • क्वारंटाईन सेवेसाठी नेमलेल्या आस्थापना
  • इलेक्ट्रिशिअन, आयटी, रिपेअर्स, प्लंबर, मोटर मेकॅनिक, सुतारकाम यासाठी स्वयंरोजगाराची कामे करणाऱ्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे
  • आरोग्य सेवेसाठी नव्याने जाहीर केलेल्या मार्गदर्शकांनुसार या सेवा सुरू राहतील. तसेच राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालयने आवश्यक मनुष्यबळानुसार कार्यरत राहतील

हेही वाचा –

Lockdown Crisis: कोण आहे विनय दुबे? त्याच्या आवाहनानंतर वांद्रे येथे गर्दी जमली?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -