घरमुंबईप्रवाशांनी गाडी वेगात चालवा म्हणताच, एसटी चालक गाडीतूनच पळाला

प्रवाशांनी गाडी वेगात चालवा म्हणताच, एसटी चालक गाडीतूनच पळाला

Subscribe

सोलापूर : गाडी फास्ट चालव असा तगादा एसटी बस ड्रायव्हरकडे प्रवाशांनी धरल्यानंतर रागाच्या भरात बस यवतजवळील हायवेवर बाजूला थांबवून ड्रायव्हर निघून गेल्याची अजब घटना शनिवारी (29 एप्रिल) समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत हायवेवर थांबावे लागल्याचा धक्कादायक प्रकार एका प्रवाशाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समोर आणला आहे.

बोरिवली बस डेपोमधून शनिवारी बोरिवली ते धाराशिव एसटी बस सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धाराशिवकडे जाण्यासाठी निघाली. ही बस बोरिवली-पुणे-इंदापूर-बार्शी मार्गे धाराशिवकडे जाणार होती. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही गाडी पुण्यातील यवत येथे पोहचल्यानंतर गाडीतील प्रवाशांनी गाडी फास्ट चालवा असा तगादा लावला. त्यामुळे राग आलेल्या ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून कुठेतरी निघून गेला. त्यामुळे प्रवाशांना जवळपास अर्धा तास ताटकळत हायवेवर थांबावे लागले. याबाबतचा व्हिडिओ अहमद शेख या प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

- Advertisement -

बस ड्रायव्हरने तीन ते चार उशीर केला
बस ड्रायव्हरने बोरिवली ते पुणे दरम्यान प्रवास करताना जवळपास तीन ते चार तास उशीर केला होता. त्यामुळे बोरिवलीमध्ये बसलेले प्रवाशी ड्रायव्हरवर आधीच भडकले होते. दुपारी दोनच्या सुमारस स्वारगेटहून एसटी बस धाराशिवकडे निघाल्यानंतर यवतजवळ एका महिला प्रवाशाने एसटी चालकाला ऐकवायला सुरूवात केल्यानंतर इतर प्रवाशांनीदेखील एसटी ड्रायव्हरला ऐकवायला सुरूवात केली. त्यामुळे राग आलेल्या ड्रायव्हरने रागाच्या भरात बस हायवेवर थांबवून तशीच चालू ठेवून कुठेतरी निघून गेला. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी कंडक्टरकडे फेसबुक लाईव्ह करत पैसे परत मागण्यास सुरूवात केली. त्यामुळे कंडक्टरने ड्रायव्हरला फोन करून परत बोलावून घेतले. फोन केल्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने एसटी ड्रायव्हर परत आला आणि पोलीस स्टेशनला महिलेविरोधात तक्रार करण्यासाठी गेलो होतो अशी माहिती दिली. ड्रायव्हर म्हणाला की, प्रवासी महिला मला सतत गाडी फास्ट चालवायला सांगत होती. त्याचा मला मानसिक त्रास झाल्यामुळे तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्यानंतर कंडक्टर आणि इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत पुन्हा एसटी बस चालवण्याची विनंती केल्यानंतर बस यवतहून धाराशिवच्या दिशेने निघाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -