घरताज्या घडामोडी'लॉकडाऊनची भाषा करता आणि रात्री १ वाजेपर्यंत पब चालू ठेवता?'

‘लॉकडाऊनची भाषा करता आणि रात्री १ वाजेपर्यंत पब चालू ठेवता?’

Subscribe

'लॉकडाऊनची भाषा करता आणि रात्री १ वाजेपर्यंत पब, बार सुरु ठेवता ही विरोधाभासी भूमिका आहे', असा टोला शेलाराने राज्य सरकारला लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आलेख हा खाली होता. मात्र, आता अचानक ही आकडेवारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सावधगिरी बाळगली नाहीतर पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करावा लागेल, असे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. यावर भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘लॉकडाऊनची भाषा करता आणि रात्री १ वाजेपर्यंत पब, बार सुरु ठेवता ही विरोधाभासी भूमिका आहे’, असा टोला शेलाराने राज्य सरकारला लगावला आहे.

मंत्रीच लसीकरणाबद्दल प्रश्न उपस्थित करतात

‘पहिल्या कोरोनाच्या टप्प्यात राज्याची स्थिती काय होती. ती सरकारने राज्य सरकार समोर आणली पाहिजे. ज्यावेळी सरकारमध्ये बसलेले मंत्रीच लसीकरणाबद्दल आणि लसीवर प्रश्न उपस्थित करतात. तसेच त्यांच्या प्रश्नांमुळे जनतेमुळे भितीचे वातावरण निर्माण करतात. यावरुन योग्य नेतृत्व लसीकरणाच्या कार्यक्रमाला मिळत नसल्याचे स्पष्ट होते. तसेच आम्हाला लसीच उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरण होत नसल्याचे दाखवले जात आहे. यामुळे आज जवळजवळ साडे चार लाख नर्स आणि फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण झालेले नाही. याला केवळ राज्य सरकारच दोषी आहे. नर्सना लस का मिळाली नाही. याचे कारण काय आहे. याबाबत दिरंगाई का होत आहे, याचे राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे’.

- Advertisement -

अबु आजमी यांचा अभ्यास कच्चा

‘विनयभंग, बलात्कार, विवाहित किंवा लिविंग रिलेशनशिपमधील महिला आत्महत्या करुच शकत नाही, असे वक्तव्य करणाऱ्या अबु आसीम आजमी यांचा अभ्यास कच्चा आहे. हे असे बोलणे म्हणजे महिलांचा अपमान करणे आहे. याशिवाय कायदेशीरदृष्या अवैध गोष्ट बोलण्यासारख आहे आणि आम्ही या गोष्टीचा निषेध करतो.’


हेही वाचा – Corona Alert : मुंबईकरांनो सावध व्हा! ‘ही’ आहे धोक्याची घंटा

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -