सन्मान देण्याची वेळ येते तेव्हा शिवसेनेकडून छत्रपतींचा अपमान – अशिष शेलार

Ashish Shelar

संभाजीराजेंना (Sambhaji Raje) राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्यावरून अशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. जेव्हा जेव्हा आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक वेळी शिवसेनेने (Shiv Sena) त्यांचा अपमान केला आहे, असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला. शेलार यांनी पत्रकार परिषदेतील आपला व्हिडीओ ट्वीट करत शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

हेही वाचा – राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय पवारांना उमेदवारी, मुख्यमंत्र्यांकडून लवकरच अधिकृत घोषणा – संजय राऊत

ते छत्रपतींच्या वंशजांचे पुरावे मागतात –

संभाजी राजे (Sambhaji Raje) यांना राज्यसभेच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यावरून आशिष शेलार यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) टीका केली आहे. जेव्हा जेव्हा छत्रपतींना (Sambhaji Raje) सन्मान देण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक वेळी शिवसेनेने  त्यांचा अपमान केला आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे. याबाबत ट्विट त्यांनी केले आहे. छत्रपतींच्या घराण्याचा जेवढा अनादर आणि अपमान शिवसेनेने केला तेवढा कोणीच केलेला नाही. आपण बघितले असेल ते विश्वविख्यात छत्रपतींच्या वंशजांच्या घराण्याचे पुरावे मागतात.

हेही वाचा – मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असा विश्वास, राज्यसभा उमेदवारीवर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

मोदींनी त्यांचा सन्मान केला –

जेव्हा छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्यावेळी आपल्या पक्षाची अट घातली जाते हे सुद्धा चित्र आपण पाहिले आहे. छत्रपतींच्या सन्मानाचा विषय समोर आला तेव्हा भारतीय जनता पक्षाने एकमुखाने छत्रपतींना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत पाठवले. स्वतः देशाचे पंतप्रधान मोदींनी त्यांचा सन्मान केला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, असे अशिष शेलार म्हणाले.