घरताज्या घडामोडीमुंबई महानगरपालिकेने नालेसफाई खर्चाचा हिशेब द्यावा, आशिष शेलार यांची मागणी

मुंबई महानगरपालिकेने नालेसफाई खर्चाचा हिशेब द्यावा, आशिष शेलार यांची मागणी

Subscribe

डिफॉल्टर कॉन्ट्रॅक्टर कडून २-२ कोटी वसूली

मुंबई महानगपालिकेने १०० टक्के नालेसफाई केली असल्याचा दावा केला आहे. तर काही ठिकाणी १०७ टक्के सफाई झाली असल्याचे सांगितले आहे. सांताक्रुझ पश्चिमेकडील पीएमटी नाल्यामध्ये कचरा तसाच आहे. नाल्यामध्ये अजूनही सफाईचे काम केले नाही तरीही दावा केला जात आहे. पालिकेचा दावा पुर्णपणे फोल आहे. कंत्राटदार १०० टक्के स्वतःचे पैसे काढेल परंतु त्याला संमर्थन देणारे प्रशासन कसे काय समर्थ असू शकते? कंत्राटदाराच्या १०० टक्केच्या दाव्याला सत्ताधारी शिवसेनेचे समर्थन कसे काय असू शकते? यांचे काही लागेसंबध आहेत का? असा सवाल भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

नालेसफाईचे ऑडिट २ प्रकारे केले पाहिजे. पहिले नालेसफाईत काढलेला गाळ कुठे टाकण्यात आला आहे. डंपिंग ग्राऊंडला पब्लिक का प्रायव्हेटला गेला? त्या गाळाचे वजन कुठे करण्यात आले? त्या ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज आहेत का? अधिकाऱ्यांच्या, कंत्राटदारांच्या आणि गाड्यांची नोंदणी लॉकबुकमध्ये आहे का? असा सवाल शेलारांनी केला आहे. नालेसफाईमध्ये केवळ धूळफेक करण्यात आली असून हाथ सफाई झाली परंतु नाले सफाई झाली नाही असा आरोपही शेलार यांनी केला आहे.

- Advertisement -

डिफॉल्टर कॉन्ट्रॅक्टर कडून २-२ कोटी वसूली

ज्या पद्धतीने गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या केस मधले संबंधित कंत्राटदार आहेत. त्यांना शिवसेना वाचवण्याचे भूमिका घेत आहे. सचिन वाझेची अटक केल्यानंतर त्यांनी न्यायालयात एक अर्ज केला. त्या अर्जात म्हटले आहे की, ज्या ५० डिफॉल्टर कंत्राचदाराची चौकशी सुरु आहे. त्यांनी २-२ कोटी रुपये देण्याची मागणी करा असे शिवसेनेतील मंत्र्यानी सांगितले आहे. यामुळे शिवसेनेशी संबंधित असलेल्या कंत्राटदारांना वाचवण्याचे काम शिवसेना करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

काँग्रेसने मुळात स्पष्ट केले पाहिजे की त्यांची नालेसफाईच्या कंत्राटात त्यांची टक्केवारी किती आहे. सगळ्या विषयाच्या समर्थनार्थ हात वर करणार आणि बाहेर आल्यावर हात पुढे करणार हे हाताचे धंदे काँग्रेसने बंद करावे असा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -