घरमुंबईAshish Shelar : देव, देश आणि धर्मासाठी निवडणूक लढवायचीय; ईशान्य मुंबईतून भाजपाची...

Ashish Shelar : देव, देश आणि धर्मासाठी निवडणूक लढवायचीय; ईशान्य मुंबईतून भाजपाची प्रचाराला सुरुवात

Subscribe

मुंबई : मुंबईत लोकसभेच्या सहाही जागा महायुती लढवणार आणि जिंकणारच, असा निर्धार भाजपाचे मुंबई जिल्हा अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. तसेच, यंदाची लोकसभा निवडणूक देव, देश व धर्मासाठी लढायची आहे, असे आवाहनही त्यांनी भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केले आहे. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातील घाटकोपर (पूर्व) भाटिया वाडी येथे भारतीय जनता पक्ष – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपाई (अ)- शिवसंग्राम – पी.आर.पी. (आठवले गट), रयत क्रांती महायुतीच्या कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी, उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. (Ashish Shelar Elections should be contested for God country and religion BJP started campaigning from North East Mumbai)

हेही वाचा – Politics : सत्ताधारी नेत्यांच्या कारखान्यांना अर्थसहाय्य; अशोक चव्हाणांना गिफ्ट, मात्र पंकजा मुंडेंना मदत नाही

- Advertisement -

याप्रसंगी, भाजपाचे स्थानिक खासदार मनोज कोटक, आमदार पराग शहा, राम कदम, मिहिर कोटेचा, माजी आमदार प्रकाश मेहता, माजी आमदार शाम सावंत, मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, मंगल भानुशाली, सुरेश गोलतकर, रितू तावडे, बिंदू त्रिवेदी, अश्विन व्यास, समिता कांबळे, शिवसेनेचे माजी आमदार अशोक पाटील, माजी नगरसेवक परमेश्वर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी भाटिया वाडीत मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाच्या नावाखाली बुधवारी मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातील घाटकोपर (पूर्व) भाटिया वाडी येथे भाजप, शिवसेना ( शिंदे गट), आरपीआय महायुतीतर्फे प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

- Advertisement -

भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या लोकसभा निवडणुकीत “अबकी बार 400 पार” आणि “भाजपा 370 पार” हे टार्गेट लक्षात घेवून काम करावे. एकाही बुथवर विरोधी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदानात पुढे जावू जावू न देण्याचा निश्चय करा. अन्यथा त्या बुथवर महाविकास आघाडीमुळे देव, देश धर्म धोक्यात येईल. अगदी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तोंड दाखवायला जागा देवू नका, असे आवाहन शेलार यांनी यावेळी केले.

हेही वाचा – Loksabha Election : भाजपा जिंकल्यावर लाकडे गोळा करावी लागतील; ममतांनी सांगितले कारण…

मनोज कोटक जनतेच्या मनातील खासदार

मनोज कोटक यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबचा निर्णय पक्ष घेईल. मात्र मनोज कोटक हेच जनतेच्या मनातील खासदार आहेत, असे सांगत शेलार यांनी खा. कोटक यांनी त्यांच्या मतदार संघात केलेल्या विकासकामांबाबत प्रशंसा केली.

कोरेगाव भीमा दंगलीमागील हात शरद पवारांना कळतील

भीम सैनिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सैनिक आजही मोठ्या संख्येने ज्या कोरेगाव भीमा येथे अभिवादन करायला येतात, त्या कोरेगाव भीमा येथील दंगलीमागे कोणाचे हात आहेत, ते शरद पवार यांना लवकरच कळेल. या प्रकरणी न्यायालयात खटला चालू आहे. मी कोणाचे नाव घेत नाही, असे वक्तव्य शेलार यांनी केल्याने उपस्थितांमध्ये चर्चेला उधाण आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -