घरमुंबईउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करणार, आशिष शेलारांनी केला निश्चय

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करणार, आशिष शेलारांनी केला निश्चय

Subscribe

मुंबई – मुंबई महानगर पालिकांच्या तोंडावर भाजपाने आशिष शेलार यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद सोपवलं आहे. आशिष शेलार यांनी ३० नगरसेवकांवरून ८२ नगरसेवक निवडून आणले होते, म्हणून त्यांच्याकडेच हे पद पुन्हा सोपवण्यात आल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली. दरम्यान, अध्यक्षपदी विराजमान होताच त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करणार असल्याचा चंगच आशिष शेलार यांनी बांधला आहे. (Ashish Shelar on Uddhav Thackeray about bmc election)

हेही वाचा – चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी आशीष शेलार यांच्याकडे

- Advertisement -

मुंबईतील रखडलेला कोस्‍टल रोड, मेट्रोच्‍या आरेतील कारशेडला अडवणे, रस्त्यावर पडलेले खड्डे, संगणक खरेदीमध्‍ये भ्रष्‍टाचार, शालेय साहित्‍य देण्यात झालेला विलंब अशी अत्‍यंत भ्रष्‍ट व्‍यवस्‍था मुंबई महापालिकेत असून मुंबईकरांना यापासून सुटका हवी आहे.  ज्‍यांनी आतापर्यंत ठराविक कंत्राटदरांना पोसले आणि कंत्राटदारांनी ज्यांना पोसले त्यांना महापालिकेतून तडीपार करण्याची गरज आहे. मुंबईकरांची ही इच्छा पूर्ण होईल, असे शेलार म्हणाले.

मुंबईकरांसाठी आम्‍ही गेली दोन दशकभर ज्‍यांच्‍या बरोबर  संघर्ष केला, त्‍या भ्रष्‍टाचारी व्‍यवस्‍थेला तडीपार करण्‍यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्ठा करेन. तसेच केंद्रीय भाजपला मुंबईत जे काम अपेक्षित आहे ते करत यश संपादन करुन देण्‍याचा प्रयत्‍न आम्‍ही करू. त्‍यासाठी मुंबईतील भाजपचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिका-यांची मोठी टीम असून सगळे मिळून आम्‍ही आमचाच महापौर महापालिकेत बसवू ,असे शेलार यांनी जाहीर केले.

- Advertisement -

हेही वाचा – हर घर तिरंगा अभियान; शनिवारपासून तीन दिवस घरांवर तिरंगा फडकवा, विनोद तावडे यांचे आवाहन

दरम्यान, आगामी मुंबई महापालिकेत शिवसेनेला चीतपट करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. हीच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाने मुंबई अध्यक्षपदाची धुरा आशिष शेलार यांच्याकडे सोपविली आहे. मुंबईतील भाजपचा महत्त्वाचा चेहरा म्हणून आशिष शेलार यांची ओळख आहे. तसेच भाजपमधील मराठा नेते म्हणूनही ते परिचित आहेत. विशेष म्हणजे, आशिष शेलारांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी अतिशय सलोख्याचे आणि उत्तम संबंध आहेत. त्यामुळे पक्षाच्या बांधणी आणि वाढीसाठी शेलारांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा भाजपला नक्कीच फायदा होऊ शकतो. 2014ला देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा काही काळ त्यांनी शिक्षणमंत्रीपदही भूषवलं होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -