घरमुंबईआठवडा उलटला तरी नालेसफाई कामात दिरंगाई - आशिष शेलार

आठवडा उलटला तरी नालेसफाई कामात दिरंगाई – आशिष शेलार

Subscribe

नालेसफाई कामांच्या पाहणीने कंत्राटदारांची तारांबळ

भाजपाचे नेते, माजी नगरसेवक मुंबईतील नालेसफाई कामांची गुरुवारपासून पाहणी करीत आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची चांगलीच तारांबळ उडत आहे. तर गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी नालेसफाईच्या कामांना अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामांत दिरंगाई होत असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेने १ एप्रिलपासून मुंबईत नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली आहे. काही ठिकाणी नाल्यातील गाळ काढण्यात आला आहे. या नालेसफाई कामांची भाजपचे आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे आमदार आणि माजी नगरसेवक हे गुरुवारपासून पाहणी करीत आहेत. गुरुवारी पाच ठिकाणी नालेसफाई कामांची पाहणी करण्यात आली. त्यावेळी फक्त एसएनडीटी नाल्याच्या ठिकाणी यंत्रणेद्वारे सफाईकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले. मात्र इतर ठिकाणी नालेसफाईच्या कामांना सुरुवातच करण्यात आलेली नव्हती. ते नाले गाळाने व कचऱ्याने भरलेले असल्याचे आढळून आले.

- Advertisement -

शुक्रवारीही भाजपचे ऍड. आशिष शेलार यांनी पक्षाचे आमदार, माजी नगरसेवकांसह पश्चिम उपनगरातील विलेपार्ले पूर्व, जुहू, वर्सोवा, मोगरा नाला, गोरेगाव शास्त्रीनगर नाला, भगतसिंग नगर येथे नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी सर्वच नाल्यांमध्ये प्रचंड गाळ व कचऱ्याचे ढीग, प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या असून अद्यापही अनेक ठिकाणी नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आलेली नाही. नालेसफाई कामांचे सध्याचे चित्र भयावह आहे. अवघा दीड महिन्याचा कालावधी आता शिल्लक असून दीड महिन्यात ही साफसफाई होईल का? या वर्षी दरवर्षीपेक्षा अधिक भयानक पूर परिस्थितीला मुंबईकरांना सामोरे जावे लागेल का? असे सवाल उपस्थित करीत आमदार आशिष शेलार यांनी नालेसफाई कामांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

या नालेसफाई पाहणी दौर्‍यात, भाजपचे आमदार अमित साटम, भाजप माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी पक्षनेते विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, माजी नगरसेवक अनिश मकवानी, सुधा सिंग, रेणू हंसराज, योगिराज दाभाडकर, रंजना पाटील, हर्ष पटेल, संदीप पटेल, दीपक ठाकूर, श्रीकला पिल्ले आदी सहभागी झाले होते

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -