घरक्रीडाआशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या मंजिरी भावसारला कांस्यपदक

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या मंजिरी भावसारला कांस्यपदक

Subscribe

मालदीवमध्ये 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा (Asian Bodybuilding Competition) नुकताच पार पडली. या स्पर्धेत मुंबईच्या डॉ. मंजिरी भावसारने कांस्यपदक जिंकले आहे. वरिष्ठ महिलांच्या 155 सेमी उंचीच्या मॉडेल फिजीक प्रकारात मंजिरीने कांस्यपदक जिंकले असून, तिने आपले आंतरराष्ट्रीय पदाकचे स्वप्न पुर्ण केले.

मालदीवमध्ये 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा (Asian Bodybuilding Competition) नुकताच पार पडली. या स्पर्धेत मुंबईच्या डॉ. मंजिरी भावसारने कांस्यपदक जिंकले आहे. वरिष्ठ महिलांच्या 155 सेमी उंचीच्या मॉडेल फिजीक प्रकारात मंजिरीने कांस्यपदक जिंकले असून, तिने आपले आंतरराष्ट्रीय पदाकचे स्वप्न पुर्ण केले. मंगळवारी या स्पर्धेचा निकाल लागला. यामध्ये भारतीय (Indian) खेळाडू नेत्रदीपक कामगिरी केली. पुरुष खेळाडूंच्या बरोबरीने भारताच्या महिला खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. (Asian Bodybuilding Competition Manjiri Bhavsar of Mumbai won the bronze medal)

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत मंगळवारी भारताच्या महिला खेळाडूंनी १ सुवर्ण आणि ४ कांस्यपदके जिंकली आहेत. भारतात या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पहिल्या दमदार कामगिरी करत भारताच्या पुरूष खेळाडूंनी ४ सुवर्णांसह एकूण १२ पदके जिंकली होती. आता एकूण ५ सुवर्णांसह १७ पदके भारताने जिंकली आहेत.

- Advertisement -

स्पर्धेच्या महिला गटाच्या सर्व लढती निसर्गरम्य क्रॉसरोड बेटावर झाल्या. भारतीय या खेळाडूंच्या कामगिरीनं इतर देशातील खेळाडू देखील भारावून गेले आहेत. दरम्यान, या स्पर्धेत महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात डॉली सैनीने सुवर्णपदक पटकावले. या गटात आतापर्यंत यजमसान थायलंड, मंगोलिया आणि व्हिएतनामच्या महिला खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे.

या देशांच्या अव्वल खेळाडूंना भारताच्या महिलांनी जोरदार टक्कर दिली. भारताच्या डॉली सैनीने थायलंडमध्ये पहिला क्रमांक पटकावत तिरंगा फडकावला. तसेच, ज्यूनियर महिलांच्या मॉडेल फिजीक प्रकारात अव्वल ५ मध्ये भारताच्या तीन खेळाडूंनी स्थान मिळवले.

- Advertisement -

मंगोलियाच्या मुंगुनशगाई हिने सुवर्णपदक जिंकले. भारताच्या सोलिमला जाजोला रौप्य तर भाविका प्रधानला कांस्य मिळाले. चौथा क्रमांकही भारताच्याच सोलन जाजोने मिळविला. शिवाय, महिलांच्या गटात थायलंडच्या महिला खेळाडूंचा दबदबा राहिला. त्यांनी महिलांच्या २१ गटांपैकी ५ गटात सुवर्ण आणि २ रौप्य जिंकत सर्वाधिक ६३० गुणांसह सांघिक विजेतेपद पटकावले.

व्हिएतनामने ४ सुवर्णांसह ४८५ गुण मिळवत उपविजेतेपद आणि मंगोलियाने तीन सुवर्ण जिंकत ४४० गुणांसह तिसरा क्रमांक राखला. भारताच्या पुरूष खेळाडूंनी ४ सुवर्णांसह एकूण १२ पदके जिंकली होती. आता एकूण ५ सुवर्णांसह १७ पदके भारतानं आपल्या खात्यात जमा केली आहे.


हेही वाचा – विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मैराज खानला सुवर्णपदक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -