घरताज्या घडामोडीटास्क फोर्स करणार कोरोनाचा अभ्यास - अस्लम शेख

टास्क फोर्स करणार कोरोनाचा अभ्यास – अस्लम शेख

Subscribe

महाराष्ट्रातच झपाट्याने कोरोना वाढत असताना विधानसभा निवडणूक होत असलेल्या राज्यांमध्ये मात्र कोरोना वाढताना दिसत नाही. त्यामुळे यासंदर्भात आम्ही टास्क फोर्सला अभ्यास करण्याची सूचना केल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संसर्गाची तीव्रता वाढली आहे. कोरोनाच्या या वाढत्या रुग्णसंख्येबाबत अस्लम शेख यांनी शंका उपस्थित केली आहे. टास्क फोर्सला याबाबत माहिती घेण्यास सांगितले असल्याचे अस्लम शेख यांनी पत्रकारांना सांगितले.

महाराष्ट्रातच कोरोना संसर्ग का वाढत आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तेथे का नाही? निवडणुका असलेल्या राज्यात हजारोंच्या संख्येने प्रचार सभा होत आहेत. तरीही तिथे कोरोना संसर्ग कसा वाढत नाही? असा सवाल शेख यांनी केला.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात रविवारी ६३ हजाराहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारच्या टास्क फोर्सची बैठकीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


हेही वाचा – बीएमसीतही बदल्यांसाठी तोडपाणी, आयुक्तांनी चौकशी आणि कारवाई करावी – रईस शेख

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -