सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकांची मालमत्ता ईडीकडून जप्त, काय आहे प्रकरण? वाचा

ईडीकडून आता सिरम इन्स्टिट्यूटचे संचालक झेड. एस. पूनावाला यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ईडीने पनामा पेपर प्रकरणात पूनावाला यांचे व्यवहार संशयास्पद वाटल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे सांगितले आहे.

Assets of Serum Institute Director seized by ED

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ईडीने व्यावसायिक आणि विविध प्रकरणांत दोषी आढळणाऱ्या लोकांवर कारवाईचा बडगा उभारला आहे. ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, असे विरोधकांकडून वारंवार बोलले जात आहे. पण ईडीकडून आता सिरम इन्स्टिट्यूटचे संचालक झेड. एस. पूनावाला यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. (Assets of Serum Institute Director seized by ED) ईडीने पनामा पेपर प्रकरणात पूनावाला यांचे व्यवहार संशयास्पद वाटल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी कारवाई करत ईडीने पूनावाला यांची मुंबईतील मालमत्ता जप्त केली आहे. त्यांच्या मुंबईतल्या सीजे हाऊसमधल्या 41.64 कोटी रुपयांच्या तीन स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केलेल्या आहेत. फेमा (FEMA) कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

काय आहे प्रकरण?
सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने पनामा पेपर्सच्या प्रकरणात झेड. एस. पूनावाला यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव समोर आले. त्यानंतर पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्याविरोधात तपास करण्यात आला. ज्यानंतर ईडीने फेमा कायद्याच्या अंतर्गत पूनावाला यांची मुंबईतील वरळीमधील स्थावर मालमत्ता जप्त केली. दरम्यान या प्रकरणाचा ईडीकडून अधिक तपास करण्यात येत आहे. पनामा पेपर्समध्ये ऑफ-शोअर संस्थांसंदर्भातील खुलाशांमध्ये त्याचे नाव आढळून आल्याचे इडीकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – NEET Exam: विद्यार्थिंनीना खुल्या मैदानात बदलावे लागले कपडे; काय आहे संपूर्ण प्रकार