घरमुंबईसहाय्यक आयुक्त आशुतोष मिश्रांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल; गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

सहाय्यक आयुक्त आशुतोष मिश्रांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल; गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Subscribe

सुरुवातीला आशुतोष मिश्रा यांनी सर्व आरोप फेटाळले मात्र पोलिसांच्या टीमे त्यांच्याविरोधातील सर्व वस्तुस्थिती आणि पुरावे समोर आणले तेव्हा ते जाळ्यात अडकले.

मुंबईतील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली केल्याप्रकरणी बस्ती येथे तैनात वाणिज्य कर विभागाचे सहाय्यक आयुक्त आशुतोष मिश्रा यांना मंगळवारी मुंबई गुन्हे शाखेचे क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटने अटक केली आहे. आरोपी आशुतोष मिश्रा हा मुंबई पोलिसांचे बडतर्फ आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांचा मेहुणा असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्याविरोधात दरोडा टाकल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे.

मुंबई क्राईम ब्रँचचे क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट तीन दिवसांपूर्वीच बस्ती याठिकाणी पोहोचले होते. सर्व माहिती गोळा केल्यानंतर हे युनिट  मंगळवारी कोतवाली पोलिसांसह वाणिज्य कर विभागाच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी सहाय्यक आयुक्त आशुतोष मिश्रा कार्यालयात काम करत होते, त्याच दरम्यान पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली. आंबेडकर नगर जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील इंद्रलोक कॉलनी येथील ते रहिवासी आहे.

- Advertisement -

दरम्यान पोलिसांच्या टीमने त्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात नेले आणि याठिकाणी बडतर्फ आयपीएस सौरभ त्रिपाठीसोबत असलेले संबंध आणि मुंबईतील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली प्रकरणातील सहभागाबाबत दोन तास कसून चौकशी केली.

सुरुवातीला आशुतोष मिश्रा यांनी सर्व आरोप फेटाळले मात्र पोलिसांच्या टीमे त्यांच्याविरोधातील सर्व वस्तुस्थिती आणि पुरावे समोर आणले तेव्हा ते जाळ्यात अडकले. यावेळी गुन्हे शाखेने आशुतोष मिश्रा यांना अटक करत वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर संध्याकाळी त्यांना सीजेएम उमेश यादव यांच्यासमोर हजर करत ट्रान्झिट रिमांडची मागणी केली. तर दुसरीकडे आरोपी सहाय्यक आयुक्तांचे वकील विजयसेन सिंह यांनी याला विरोध करत आपल्या अशिलाला गोवण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान सीजेएमने मुंबई क्राइम ब्रँचच्या क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटने 8 एप्रिलपर्यंत मागितलेली ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. तसेच त्यांना आता मुंबईतील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मुंबईतील एलटी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अंगडिया, व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी मुंबईचे तत्कालीन डीसीपी सौरभ त्रिपाठी यांच्याविरुद्ध मुंबईतील एलटी मार्ग पोलीस ठाण्यात खंडणी आणि दरोडा आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण डिसेंबर 2021 चे आहे. अंगडिया असोसिएशनने मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेत डीसीपींवर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. तपासणीदरम्यान ही बाब खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डीसीपी सौरभ त्रिपाठी यांना बडतर्फ करण्यात आले आहे. बऱ्याच दिवसांपासून ते फरार आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रँचच्या क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटच्या तपासात बस्ती येथे तैनात असलेले वाणिज्य कर विभागाचे सहाय्यक आयुक्त आशुतोष मिश्रा यांचे नाव पुढे आले, त्यानंतर मुंबई पोलिसांना त्याला देखील अटक केली आहे.


Milk Price Hike : दुधाच्या दरात पुन्हा मोठी वाढ, अमूलने सांगितले ‘या’ दरवाढीमागचे कारण

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -