घरमुंबई१३ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे, आठ मंत्री अल्पशिक्षित; नव्या मंत्रिमंडळातील आमदारांची कुंडलीच सादर

१३ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे, आठ मंत्री अल्पशिक्षित; नव्या मंत्रिमंडळातील आमदारांची कुंडलीच सादर

Subscribe

तब्बल दीड महिन्यांनंतर राज्यातील आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भाजपाच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून यामध्ये सर्वच मंत्रि कोट्यधीश आहेत. मात्र, तब्बल ४० टक्के आमदार हे आठवी पास असून ५१ टक्के आमदार पदवी किंवा पदव्युत्तर शिकलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, ७५ टक्के मंत्र्यांवर फौजदारी खटलेही दाखल आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून विविध माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – शिंदे गटाकडून मुंबईसाठी रणनीती; दादरमध्ये मुख्यालय बांधणार, जागोजागी शाखा उभारणार

- Advertisement -

एकनाथ शिंदे गटाने २१ जून रोजी शिवसेनेत बंडखोरी केली. शिंदे यांच्यांसोबत ४० आमदारांनी शिवसेनेत फूट पाडली. आता आम्ही मूळ शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर जवळपास दीड महिना दोघेच सरकार हाकत होते. दोघांचे जम्बो मंत्रिमंडळ म्हणूनही या दोघांवर टीका करण्यात आली. या दोघांच्या मंत्रिमंडळात तब्बल ७०० हून जीआर पास करण्यात आले. दरम्यान ३९ दिवसांनंतर १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्यापही खातेवाटप झालेले नाही. परंतु, या शपथ घेतलेल्या मंत्र्यांची कुंडलीच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने मांडली आहे. यातून बरेच खुलासे होत आहेत.

हेही वाचा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान, सरपंचांचीही थेट जनतेतून निवड होणार

- Advertisement -

७५ टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल

२०१९ विधानसभा निवडणुकीत आमदारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने केले. यातून असं समोर आलं की मंत्रिमंडळातील तब्बल ७५ मंत्र्यांवर म्हणजेच १५ मंत्र्यांवर फौजदारी खटले दाखल आहेत. यापैकी ६५ टक्के म्हणजे १३ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

मंगल प्रभात लोढा सर्वांत श्रीमंत मंत्री

मलबार हिल मतदारसंघाचे भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा हे या मंत्रिमंडळातील सर्वांत श्रीमंत मंत्री आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्रात ४४१.६५ कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. तर, पैठणमधील शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांची सर्वांत कमी संपत्ती आहे. २.९२ कोटी संपत्ती असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात सादर केली होती.

हेही वाचा – भाजपला प्रादेशिक पक्ष आणि मित्र पक्ष संपवण्यातच अधिक रुची, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

४० टक्के मंत्री दहावी ते बारावी पास

आपला आमदार उच्च शिक्षित असावा अशी साधारण अपेक्षा प्रत्येक मतदारसंघातील लोकांची असते. मात्र, शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये ८ मंत्री दहावी ते बारावी पास असलेले मंत्री आहेत. तर, ११ मंत्र्यांनीच पदवी शिक्षण घेतले असल्याचे जाहीर केले आहे. एका मंत्र्याने डिप्लोमा केला आहे. तसंच, ४१ ते ५० वयोगटातील चार मंत्री असून उर्वरित मंत्री ५१ ते ७० वर्षे वयोगटातील आहेत.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -