घरमुंबईअथर्व शिंदेचा मृत्यू ड्रग्जच्या अतिसेवनानेच

अथर्व शिंदेचा मृत्यू ड्रग्जच्या अतिसेवनानेच

Subscribe

आर्थिक गुन्हे शाखेतील नरेंद्र शिंदे यांचा मुलगा अथर्व शिंदे याचा मृत्यू मद्यप्राशन आणि ड्रग्जच्या अतिसेवनाने झाला असल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

कांदिवली येथे राहणारे आर्थिक गुन्हे शाखेतील नरेंद्र शिंदे यांचा मुलगा अथर्व शिंदे याचा मृत्यू मद्यप्राशन तसेच ड्रग्जच्या अतिसेवनाने झाला आहे, असे चौकशीतून उघडकीस आले आहे. सर्व वैद्यकीय अहवाल आल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. ७ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता अथर्व त्याच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गोरेगाव येथे गेला होता.

आरे कॉलनीतील एका बंगल्यात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. तिथेच अथर्व याच्यासह तीसहून अधिक तरुण-तरुणी तसेच काहींचे पालकही सामील झाले होते. पार्टीत रात्री उशिरा काही मुलांचे पालक तेथून निघून गेल्यानंतर या ठिकाणी तरुण-तरुणींनी अक्षरश: धिंगाणाच घालायला सुरुवात केली होती. ८ मे रोजी सकाळी सात वाजता अर्थवने प्रेयसीला बाहेर नेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती त्याच्यासोबत बाहेर आली नाही. त्यानंतर साडेसात वाजता तो एकटाच बाहेर निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले. काही अंतर गेल्यानंतर त्याने एका रिक्षाचालकाला थांबविले, मात्र त्याला नक्की कुठे जायचे होते, हे त्याला सांगता आले नव्हते, त्यावरून त्याचा रिक्षाचालकाशी वाद झाला होता. काही अंतर गेल्यानंतर रिक्षाचालकाने त्याला तिथेच सोडून दिले. बंगल्यापासून सात ते आठ फूट अंतरावर तो दिवसभर पडून होता.

- Advertisement -

मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीत मद्यधुंद झाला

अथर्वने मित्र-मैत्रिणींसोबत मद्यानंतर एलएसडी, गांजा आणि एमडीसारख्या ड्रग्जचे सेवन केले होते. दोन दिवसांनी अथर्वचा मृतदेह आरे कॉलनीतील जंगलात आरे पोलिसांना सापडला होता. शवविच्छेदन अहवालात अथर्वने मद्यासह ड्रग्जचे सेवन केल्याचे उघडकीस आले. त्याच्या शरीरावर काही दुखापतीच्या जखमा होत्या. या दुखापती मारहाणीच्या नसून तो पडल्यामुळे झाल्याचे उघडकीस आले.

लैंगिक अत्याचार झाल्याचे वडिलांचे म्हणणे

या प्रकरणी आरे पोलिसांनी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. मात्र अथर्वची हत्या झाली नसून त्याचा अपघाती मृत्यू झाला असल्याचे पोलिसांचे ठाम मत आहे. घटनास्थळाहून पोलिसांनी पाच सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. ते सर्व फुटेज एफएसआयकडे पाठविण्यात आले आहे. नरेंद्र शिंदे यांनी अथर्व याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. मात्र वैद्यकीय अहवालात ही बाब उघडकीस आली नाही. गुन्हे शाखेचे अधिकारी सध्या अंतिम पोस्ट मॉर्टम रिपोर्टची प्रतिक्षा करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -