Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइममरोळ येथे एटीएमला आग; नुकसानाची माहिती अद्यापही गुलदस्त्यात

मरोळ येथे एटीएमला आग; नुकसानाची माहिती अद्यापही गुलदस्त्यात

Subscribe

अंधेरी ( पूर्व), मरोळ येथील तळमजला अधिक चार मजली मुकुंद नगर को- ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये खालील भागात एसबीआयकडून बसविण्यात आलेल्या एटीएम मशीनमध्ये सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागली.

मुंबई : अंधेरी (पूर्व) मरोळ येथे एका सोसायटीमधील ‘एसबीआय’च्या एटीएमला सोमवारी (2 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीत एटीएम जळून खाक झाली. मात्र या मशीनमध्ये रोख रक्कम होती का, जर रोख रक्कम होती तर ती नेमकी किती होती, ती सर्व रक्कम जळून खाक झाली का ? याबाबत नेमकी माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.(ATM fire at Marol Damage information still under wraps)

प्राप्त माहितीनुसार, अंधेरी ( पूर्व), मरोळ येथील तळमजला अधिक चार मजली मुकुंद नगर को- ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये खालील भागात एसबीआयकडून बसविण्यात आलेल्या एटीएम मशीनमध्ये सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीच्या घटनेमुळे सोसायटीच्या परिसरात एकाच खळबळ उडाली. सोसायटीमधील काही रहिवाशांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन एटीएम मशीनला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा : अखेर समुद्राचे पाणी गोडे होणार; 13 हजार कोटींचे टेंडर निघणार

आगीचे कारण अस्पष्ट

अग्निशमन दलाच्या जवानांनी मशीनला लागलेली आग काही अवधीतच विझविली. त्यामुळे पुढील धोका टळला. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र ही आग का व कशी काय लागली याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : 24 जणांच्या मृत्यूनंतरही आणखी 70 रुग्ण अत्यवस्थ; विरोधकांकडून सरकारवर ताशेरे

 

दहीसरमध्येही लागली होती आग

दहिसर ( पूर्व), एस व्ही रोड येथील तळमजला अधिक एकमजली वर्धमान इंडस्ट्रियलमध्ये शनिवारी रात्री 10.50 वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. या आगीत इंडस्ट्रियलमधील तीन ते चार गाळे जळाले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. मात्र रात्री 11.10 वाजेपर्यंत आग तीन ते चार गाळयात पसरल्याने आणि आगीची भीषणता वाढल्याने अग्निशमन दलाने सदर आग स्तर- 2 ची असल्याचे जाहीर केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -