घरमुंबईनात्यांना काळीमा; मुलीवरील अत्याचाराला सख्ख्या आईचीच साथ

नात्यांना काळीमा; मुलीवरील अत्याचाराला सख्ख्या आईचीच साथ

Subscribe

काकाचा 8 वर्षाच्या पुतणीवर अत्याचार ,आईच्या मदतीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भिवंडी शहरात पुन्हा दोन अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत काकाने आपल्या 8 वर्षीय अल्पवयीन सख्या पुतणीवर अत्याचार केला, तर दुसर्‍या घटनेत आईच्या प्रियकराने तिच्या संगनमताने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही धक्कादायक घटनामुळे भिवंडीत एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पहिल्या घटनेत नवीवस्ती परिसरात पीडित अल्पवयीन मुलगी आई वडिलांसोबत राहते. तिच्या शेजारी तिचा काका सलीम शेख (39 ) राहतो. गुरुवारी सायंकाळच्या सुमाराला पीडित पुतणीला त्याच्या राहत्या घरात बहाण्याने बोलावले. त्यानंतर आतून दरवाजा बंद करत अत्याचार केला. त्याच सुमाराला पीडित मुलीचे वडील मुलीला शोधण्यासाठी घराबाहेर पडले असता त्यांना शेजारी राहणार्‍या त्याच्या भावाच्या घरातून आवाज आल्याने त्याने दरवाजाच्या फटीतून पाहिले असता हा प्रकार उघड झाला.

- Advertisement -

दुसर्‍या घटनेत 12 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी 30 वर्षीय आईसह कामतघर परिसरात राहते. तर तिच्याच घरात भरतभाई नागजीभाई पटेल (28) चेन्नईहून आलेला आईचा मित्र राहतो. आईच्या मित्राने संगनमताने पीडित मुलीवर घरातच पाच दिवस वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीने विरोध केला असता. तिच्या आईने या भरतभाई सोबत तुझे लग्न करायचे आहे,असे सांगितले. खळबळजनक बाब म्हणजे आईला आपली मुलगी अल्पवयीन आहे. हे माहिती असूनसूद्धा तिने या घृणास्पद प्रकाराला साथ दिली. दरम्यान, पीडित मुलीला वारंवार होणार्‍या अत्याचाराचा त्रास असह्य झाल्याने तिने शेजार्‍यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन झाल्या प्रकाराबाबत महिला पोलिसांना सांगितले. भिवंडी शहर पोलिसांनी नराधम भरतभाई याच्या विरोधात अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तर पीडित मुलीची आई नीलिमादेवी हिच्या विरोधातही आरोपीला अत्याचार करण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -