घरCORONA UPDATEकोरोनात बाहेर जाण्यास मनाई करणाऱ्या पत्नीच्या हत्येचा प्रयत्न; पतीला अटक 

कोरोनात बाहेर जाण्यास मनाई करणाऱ्या पत्नीच्या हत्येचा प्रयत्न; पतीला अटक 

Subscribe

कोरोना संकट असताना पती सतत घराबाहेर पडत असल्यामुळे पत्नी स्वप्ना ही काळजीपोटी पतीला घराबाहेर पडण्यास मनाई करीत असे.

कोरोनामध्ये घराबाहेर पडण्यास मनाई करणाऱ्या पतीवर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कळव्यातील खारेगाव येथे घडली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्ना गावडे (३८) असे पतीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

स्वप्ना गावडे या ब्युटीशीयन असून पती नंदकुमार गावडे (४५) दोन मुलासोबत कळव्यातील खारेगाव पारसिक नगर येथे राहत आहे. पती एका खासगी कंपनीत नोकरी करतात. लॉकडाऊनमुळे हे कुटुंब मागील ३ महिन्यापासून घरीच आहे. कोरोना संकट असताना पती सतत घराबाहेर पडत असल्यामुळे पत्नी स्वप्ना ही काळजीपोटी पतीला घराबाहेर पडण्यास मनाई करीत असे. रविवारी सायंकाळी पती घराबाहेर जात असताना पत्नी स्वप्नाने घराबाहेर जाऊ दिले नाही, म्हणून संतापलेल्या नंदकुमारने पत्नीला मारहाण करून स्वयंपाक घरातील चाकूने पत्नी स्वप्नाच्या हातावर डोक्यावर वार करून जखमी केले.

- Advertisement -

मदतीसाठी आलेल्या शेजाऱ्यांनी कळवा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमी स्वप्नाला रुग्णालयात दाखल करून पती नंदकुमार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -