घरमुंबई'भारत जोडो' दाबण्याचा प्रयत्न, पण 'यात्रे'चा परिणाम निवडणुकांमध्ये दिसतोय - राज ठाकरे

‘भारत जोडो’ दाबण्याचा प्रयत्न, पण ‘यात्रे’चा परिणाम निवडणुकांमध्ये दिसतोय – राज ठाकरे

Subscribe

मुंबई : भाजपच्या देशभरात सुरू असलेल्या विजयी घोडदौडीला कर्नाटकातील जनतेने रोखले आहे. कर्नाटकात सलग दुसर्‍यांदा सत्ता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या प्रचार यंत्रणेने पूर्ण जोर लावूनही जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा कौल दिला. याविषयी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, कर्नाटकमध्ये स्वभावाचा,वागणुकीचा आणि आपलं कोण वाकडं करू शकतो अशा विचारांचा पराभव आहे.

राज ठाकरे म्हणाले की, मी मागे माझ्या एका भाषणामध्ये मी म्हटले होते की, विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो, सत्ताधारी नेहमी हरत असतात. मला असं वाटतं कर्नाटकमध्ये स्वभावाचा, वागणुकीचा आणि आपलं कोण वाकडं करू शकतो अशा विचारांचा पराभव झाला आहे. जनतेला कधीही गृहीत धरू नये, हे या निकालामधून समोर आले आहे आणि सर्वांनी या निकालाचा बोध घेण्याची गरज आहे.

- Advertisement -

राज ठाकरे म्हणाले की, हे बदलाचे संकत नाही आहेत. नुकताच निकाल लागलेला आहे. त्यामुळे एकदम पुढे उडी मारू नका, असा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला. त्यांनी असेही सांगितले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला दिसतो आहे. तुम्ही चॅनेलवाल्यांनी आणि त्यांच्या मालकांनी भारत जोडो यात्रेला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा परिणाम लोकांमध्ये दिसतो आहे, मात्र पुढे हा प्रभाव राहील की नाही माहीत नाही. पण ते सांगायला मी काही ज्योतिषी आहे काय? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी माध्यमांना विचारला.

पहाटेचा शपथविधीसंबंधी उगाच सारवासारव नको
पहाटेचा शपथविधी हा ठाकरे गटाला दणका होता आणि ठाकरे गटाला धडा शिकवण्यासाठी हा शपथविधी केला असल्याचे विधान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, तुमच्याकडून चूक झाली आहे. त्यामुळे उगाच कुणाला धडे शिकवू नका. या गोष्टी केल्यानंतर महाराष्ट्रात हे राजकारण झालं. त्यामुळे उगाच सारवा सारव करू नका, अशा शब्दात राज ठाकरे यांनी मुनगंटीवारांवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

मनसेकडून 5 जूनला पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळा
राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कार्यशाळेविषयी रुपरेषा सांगता येणार कारण तो संघटनात्मक विषय आहे. पण येत्या 5 जूनपासून ठाणे जिल्ह्यामध्ये या प्रत्येक शहरामध्ये कार्यशाक्षा सुरू होतील, त्यांना कार्यक्रम दिले जातील आणि दिलेल्या कार्यक्रमानंतर महिन्याभरात कशा पद्धतीने त्या गोष्टी राबविल्या जात आहेत आणि कशाप्रकारे ते करत आहेत. अनेक पद अशी आहेत ज्या पदांना नेमकं त्याचं काम काय हे काही ठिकाणी सांगितले गेले नाही आहे. त्यांना त्याच काम सांगितले जाईल आणि त्या प्रमाणे कामाला जुंपवलं जाईल, असेही राज ठाकरे यांनी माहीती सांगितली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -