घरमुंबईप्रवाशांच्या गहाळ वस्तूंचा लिलाव; बेस्टला मिळणार फुकटची कमाई

प्रवाशांच्या गहाळ वस्तूंचा लिलाव; बेस्टला मिळणार फुकटची कमाई

Subscribe

मुंबई : बेस्टच्या बसमध्ये (Best Bus) प्रवास करताना प्रवासी आपल्या महागड्या वस्तू चुकून बसमध्येच विसरतात. बेस्टकडे जमा झालेल्या या वस्तू बऱ्याचदा प्रवासी आवर्जून परत घेऊन जातात. मात्र ज्या वस्तूंचे वारसदार कोण ते पुढे येत नाहीत, त्या वस्तूंचा बेस्टकडून लिलाव करण्यात येतो. बेस्टकडे सध्या लॅपटॉप, मोबाईल, कॅमेरा, ब्लू टूथ, घड्याळे आदी महागड्या वस्तू जमा असून त्या वस्तूंचा ११ मे रोजी लिलाव करण्यात येणार आहे. मात्र या वस्तू सामान्य नागरिकांना खरेदी करता येणार नाही आहे. त्यामुळे सर्व वस्तू एकत्र खरेदी करणाऱ्या कंत्राटदारांना रान मोकळे असणार आहे.

मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. मुंबईत रात्री उशिरापर्यंत कामधंदे सुरू असतात. त्यामुळे मुंबईत नागरिक रात्री झोपले तरी मुंबई मात्र सुरूच असते. अशा या धावत्या मुंबईत मुंबईकरांची नोकरी, धंद्या, कोर्टकचेरी व इतर काही खासगी कामांसाठी सतत धावपळ सुरूच असते. मुंबईत रेल्वे सर्वत्र पोहचू शकत नसल्याने बहुतांश मुंबईकर दररोज बेस्ट बसने प्रवास करतात. ही प्रवासी संख्या ३३ लाखांच्या आसपास आहे.

- Advertisement -

एवढ्या लाखो प्रवाशांपैकी अनेकजण बेस्टने प्रवास करताना घाईगडबडीत आपले महागडे लॅपटॉप, घड्याळे, मोबाईल, ब्लू टूथ, इयर फोन, कॅमेरे, डोंगल, छत्र्या, कपडे, प्लास्टिक वस्तू, हॅलमेंट, फेस शिल्ड, लेडीज चप्पल, वॉटर बॉटल, की बोर्ड, कॅल्क्युलेटर आदी वस्तू विसरतात. या वस्तू बेस्ट बसमध्ये आढळून आल्या की बस वाहक-चालक या वस्तू बस डेपोमध्ये व पुढे त्या वस्तू वडाळा डेपोमध्ये जमा करण्यात येतात.

पुढे सदर वस्तू कोणाच्या असतील त्याबाबतच्या बेस्टला प्राप्त झालेल्या तक्रारी तपासून व वस्तूंबाबत खातरजमा करून मगच संबंधित प्रवाशांना त्यांच्या मालकीच्या वस्तू त्यांच्या ताब्यात देण्यात येतात. मात्र, बेस्टकडे अनेक दिवस पडून असलेल्या वस्तू ताब्यात घेण्यासाठी कोणी मालक, प्रवासी पुढे आले नाहीत तर बेस्ट अशा वस्तूंचा जाहीर लिलाव करतात. त्या वस्तू लिलावात विकून प्राप्त होणारे पैसे बेस्टच्या तिजोरीत जमा करण्यात येतात आणि त्यांचा पुढे लिलाव होतो. याशिवाय बेस्ट उपक्रमात सध्या नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल होत आहेत. त्यामुळे जुन्या २४५ बसगाड्या, ३० जीप व १३ लॉरी बेस्टकडून लिलावात काढण्यात येणार आहेत.

- Advertisement -

या गहाळ वस्तुंचा होणार लिलाव
1. महागड्या वस्तूमध्ये लॅपटॉप, १३० स्मार्ट मोबाईल, विविध कंपन्यांचे १ हजार २८४ साधे मोबाईल, कॅमेरा स्टॅण्ड ब्लू टूथ, इयर फोन, डोंगल, की बोर्ड व माऊस, पॉवर बँक, १४७ घड्याळे, कॅल्क्युलेटर इत्यादी
2. कपडे, २९५१ छत्र्या
3. प्लास्टिक वस्तूमध्ये हॅलमेंट, फेस शिल्ड, लेडीज चप्पल, वॉटर बॉटल इत्यादी

जुन्या बसगाड्या, जीप, लॉरी यांचाही लिलाव
बेस्ट उपक्रमात सध्या नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल होत आहेत. त्यामुळे जुन्या २४५ बसगाड्या, ३० जीप व १३ लॉरी बेस्टकडून लिलावात काढण्यात येणार आहेत. त्यामुळे बेस्टला काही लाखांची रक्कम मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -