पनवेलमध्ये कोरोनाचा पहिला बळी; रिक्षाचालकाचा मृत्यू

खारघर येथील एका रिक्षाचालकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

corona virus
प्रातिनिधिक छायाचित्र

पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. खारघर येथील एका रिक्षाचालकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याच्यावर वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, पनवेल महापालिका क्षेत्रात १७ आणि पनवेल ग्रामीण भागात चार, असे एकूण २१ कोरोनाचे रुग्ण आहेत.

दोन रुग्ण कोरोनामुक्त

पनवेल मधील २१ रुग्णांपैकी ४ जणांचा अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह आढळून नंतर अहवाल निगेटिव्ह झालेल्या रुग्णांमध्ये कामोठे येथील २ , खारघर येथील १ आणि कळंबोली सीआयएसएफ जवान १ यांचा समावेश आहे. बुधवारी खारघर घरकुल येथे नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. खारघरमधील कोरोना रुग्णांची संख्या ४ झाली. मात्र , एक रुग्ण बरा होऊन घरी देखील गेला. तर अन्य दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

घरकुलमध्ये राहणाऱ्या एका रिक्षा चालकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याला वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर रिक्षाचालक काही दिवसांपासून डेंग्यूने आजारी होता. मात्र, त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घरकुल कॉलनी पनवेल महापालिका प्रशासनाने सील केला आहे .जो पर्यंत परिस्थिती आटोक्यात येणार नाही तोपर्यंत येथील रहिवाशांना घरकुल बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे . बाहेरील लोकांना देखील घरकुलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


हेही वाचा – शरद पवार यांच्या पाठिंब्याशिवाय पत्र मिळणं अशक्य, वाधवान प्रकरणी सोमय्या यांची टीका