मुंबई : राष्ट्रवादीचे नेता आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी दररोज कोणाला न कोणाला अटक होते आहे. शनिवारी देखील या प्रकरणी लॉरेन्स बिश्णोई टोळीच्या आकाशदीप करजसिंह गिल (22) याला अटक करण्यात आली. पंजाबमधील फाजिल्का येथील पक्का चिश्ती गावात तो राहतो. या प्रकरणातील ही 24 वी अटक आहे. (baba siddique murder punjab ats and maharashtra police arrested lawrence bishnoi henchman akash gill)
आकाश गिल हा कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्णोई टोळीचा सदस्य आहे. सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना रसद पुरवण्याचे काम त्याचे होते. यापुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात येणार आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : ही निवडणूक आयोगाची नौटंकी…संजय राऊत का भडकले?
पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली. पंजाब अँटी गॅंगस्टर कृती दलाने महाराष्ट्र पोलिसांच्या सहाय्याने संयुक्त अभियान राबवत सिद्दिकी हत्या प्रकरणी फाजिल्का येथे राहणाऱ्या आकाश गिल याला अटक केली. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश गिल याला पंजाबमधील भारत – पाकिस्तान सीमेवरून अटक करण्यात आली आहे. सीमा पार करून तो पाकिस्तानात जायच्या तयारीत असू शकतो, असा अंदाज आहे. आतापर्यंत या प्रकरणी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाबमधून अनेकांना अटक करण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मेन शूटर शिवकुमारसह पाच जणांना उत्तर प्रदेशातील बाराबांकी येथील नानपारा येथून अटक करण्यात आले. त्यांना देखील ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले. या पाचजणांना 19 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दसऱ्याच्या दिवशी पुत्र झीशान सिद्दिकी यांच्या बांद्रा येथील कार्यालयाबाहेरच बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडत त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर काहीच दिवसात पोलिसांनी धर्मराज कश्यप (21) आणि गुरमेल सिंह (23) या दोघांना पकडले. तर मुख्य शूटर शिवा पळून जाण्यात यशस्वी झाला. सिद्दिकी यांना गोळ्या झाडल्यानंतर हे तीनही शूटर वेगवेगळे जाऊन उज्जैन रेल्वे स्टेशवर भेटणार होते.
हेही वाचा – Naxal Attack : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याआधी गडचिरोलीत स्फोट; जीवितहानी नाही
यातील मुख्य शूटर दोन वर्षांपासून पुण्यातील एका भंगार विक्रेत्याकडे काम करत होता. सातवीतच शाळा सोडणाऱ्या शिवाला हे काम पूर्ण झाल्यानंतर 10 लाख रुपये आणि परदेश यात्रेचे आश्वासन देण्यात आले होते. (baba siddique murder punjab ats and maharashtra police arrested lawrence bishnoi henchman akash gill)
Edited by : Ashwini A. Bhatavdekar